तालुका दुष्काळी घोषित होण्यासाठी अधिकार नाही म्हणता मग दुष्काळाच्या यादीत बसलेल्या गावांचे श्रेय कसे घेता – आशुतोष काळे

कोपरगाव तालुकयातील दुस-या टप्प्यात दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या यादीमध्ये तेरा गावांचा समावेश झाल्यानंतर आमदार कोल्हे यांनी आपण पाठपुरावा केल्यामुळेच या गावांचा दुष्काळाच्या यादीत समावेश झाला अशा बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करतात आणि तालुक्यातील उर्वरित गावे दुष्काळाच्या यादीत न बसल्याने होणा-या नुकसानीची जबाबदारी घेणार का असा जाहीर प्रश्न मी विचारल्या नंतर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडून आमदारांना अधिकार असता तर तालुका केव्हाच दुष्काळग्रस्त जाहीर झाला असता असे म्हणता अशी दुतोंडी भूमिका घेवून किती दिवस शेतक-यांची फसवणूक करणार. तालुका दुष्काळी घोषित होण्यासाठी अधिकार नाही म्हणता मग दुष्काळाच्या यादीत बसलेल्या गावांचे श्रेय कसे घेता असे आमदार कोल्हे व त्यांच्या पक्षाच्या पदाधीका-यांनी वृत्तपत्रात प्रसिद्धी मिळविण्यासाठी दिलेल्या बातमीचा संदर्भ देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आशुतोष काळे यांनी आमदार कोल्हे यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी पुढे बोलतांना आशुतोष काळे म्हणाले की, मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये रब्बीचे दोन व एक उन्हाळी आवर्तन देणार असे जाहीर होताच वर्तमान पत्रात आमदार कोल्हे यांनी आपल्या नावाने प्रसिद्धी केली परंतु आवर्तन सुरु होताच अडीच किलोमीटर पर्यंतच पाणी देणार अशी कुणकुण मला लागताच मी तातडीने नासिक येथे पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांना भेटून सर्वच शेतक-यांना पाणी दया अशी विनंती केली त्यावेळीही आपल्या कार्यकर्त्याच्या नावाने वर्तमान पत्रात मी शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे शेतक-यांची दिशाभूल करीत आहे अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. परंतु त्या आवर्तनाच्या वेळी आणी आजही आवर्तन सुरु असताना काय परिस्थिती आहे हे मी सांगण्याची गरज नाही.एका बाजूला न केलेल्या कामाचे श्रेय घ्यायचे व जबाबदारी पूर्ण करण्याची वेळ आली की पळ काढायचा असे किती दिवस तालुक्याच्या जनतेची फसवणूक करणार असे तालुक्याच्या आमदार यांनी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केलेल्या बातम्यांचा संदर्भ देत तालुक्याच्या आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी या कार्यक्रमात पोलखोल केली. कोपरगाव तालुक्यातील मढी बु. ग्रामपंचायतीच्या १४ वा वित्त आयोगाच्या निधीतून नूतन ग्रामपंचायत इमारतीचे व नूतन वाचनालयाच्या इमारतीचे उदघाटन तसेच जिल्हा नियोजन अंतर्गत कोळगाव पाटी ते मढी बु. या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ व स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती अनुसयाताई होन होत्या. आमदारांचे काय काम असते हे आजपर्यंत तालुक्याच्या आमदारांना समजलेच नाही. शेजारच्या तालुक्यातील आमदार त्यांचा तालुका दुष्काळग्रस्त यादीत सामावेश व्हावा यासाठी उपोषण करत आहे आणि कोपरगाव तालुक्याच्या आमदार रेशन कार्ड आणि गॅस वाटप करीत प्रशासनाने करायची कामे करीत आहे. मी माझ्या आजोबांच्या आदर्श विचारांवर व वडिलांच्या शिकवणीवरच माझी वाटचाल करीत आहे. माझे वडील विरोधी पक्षाचे आमदार असतांनाही माझ्या वडिलांनी कोपरगाव तालुक्यात काय विकास कामे केली हे तालुक्याच्या जनतेला चांगले माहिती आहे. माझ्या वडिलांच्या शिकवणीची खरी गरज तर तुम्हाला आहे. जर तुम्ही माझ्या वडिलांची शिकवणी घेतली असती तर आज कोपरगाव तालुक्याचे विकासाच्या बाबतीत चित्र वेगळे असते – आशुतोष काळे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram