ज्येष्ठ महिलांचे भावी पिढीला मोलाचे मार्गदर्शन – सौ. चैतालीताई काळे.

ज्येष्ठ महिलांकडून खूप काही शिकण्यासारखे असून त्यांचे आदर्श विचार भावी पिढीला मोलाचे मार्गदर्शन देण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले. पाथरवट समाज सेवा मंडळ कोपरगाव बेट व कोपरगाव पाथरवट समाज महिला आघाडी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पाथरवट समाजाच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, ज्येष्ठ महिलांकडून मिळालेल्या मार्गदर्शनातून भावी पिढीला नवदृष्टी मिळते. त्यातुन आयुष्यात वेळोवेळी येणाऱ्या अडचणी व समस्यांना सामोरे जाण्याचे बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. सौ. उमाताई भोईर यांनी उपस्थित महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी जेष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हास्यकवी, व्यंगचित्रकार तथा प्रसिद्ध वात्रटीकाकार संतोष तांदळे, सौ. उमाताई वहाडणे, नगसेविका सौ. सपना मोरे, तसेच पाथरवट समाजाच्या महिला, तसेच पदाधिकारी व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram