सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाची नेहमी जाणीव ठेवली पाहिजे - सौ. पुष्पाताई काळे

आपण आपल्या घरात शांत व सुरक्षित आयुष्य जगू शकतो ते फक्त सीमेवर डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करणा-या सैनिकांमुळे. देशसेवेचे व्रत घेतेलेले सैनिक रणरणत्या उन्हात किंवा रक्त गोठेल अशा कडाक्याच्या थंडीत आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करीत असतात. कोणताही सण असो की उत्सव त्यांना माहीत नसतो. आपले कर्तव्य बजावत असतांना त्यांना आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागते. आपल्या देशाच्या शूर सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा त्याग खूप मोठा असून सैनिकांच्या उपकारांतून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही. त्यामुळे आपण नेहमी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे असे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले. `कोपरगाव येथे माजी सैनिक संघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पुढे बोलताना सौ. पुष्पाताई काळे म्हणाल्या की, देशाच्या रक्षणार्थ लढणाऱ्या सैनिकांचे कार्य अतुलनीय व अनन्यसाधारण आहे. सैनिकांचा ठराविक दिवसासाठी किंवा घटनांपुरता सन्मान, आदर न करता त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत ही भावना कायम मनात ठेवून त्यांचा नेहमी आदर राखला पाहिजे असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, पीएसआय शेळके, संघटनेच्या उपराज्यप्रमुख पाटील मॅडम, तालुकाध्यक्ष शांतीलाल होन, उपाध्यक्ष दिव्यांशु वाढेकर, पोलीस मित्र राजेंद्र देशमुख, दशरथ साळवे, बाळासाहेब रणशूर, बाबासाहेब वाघ आदी उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram