कोपरगाव तालुक्यातील चारही मंडळात दुष्काळ जाहीर करावा औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश – आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्याच्या शेजारील राहाता, संगमनेर तालुक्याचा शासनाने दुष्काळी तालुक्याच्या यादीत समावेश केला असतांना कोपरगाव तालुक्याला मात्र दुष्काळी तालुक्याच्या यादीतून वगळण्यात आले होते. कोपरगाव तालुक्यातील सर्वच गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी असतांना व ७५० मिलीमिटर पेक्षा कमी पर्जन्यमान झालेले असतांना देखील शासनाने कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळले होते. त्या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील फक्त दहेगाव मंडळातील गावांना शासनाकडून दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले तसेच तालुक्याच्या जिरायती भागातील शेतक-यांनी रास्ता रोको, आमरण उपोषण असे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्यामुळे त्या भागातील १३ गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला.परंतु कोपरगाव तालुक्यातील सर्वच भागात दुष्काळजन्य परिस्थिती असूनही शासनाकडून दुष्काळ जाहीर होत नाही त्यामुळे युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील सुनील कारभारी शिंदे, विठ्ठलराव सखाराम आसने,केशव काकासाहेब जावळे, देवराम तुकाराम गावंड आदी शेतक-यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील चारही मंडळात दुष्काळ जाहीर करावा अशी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेची सुनावनी औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती नितीन सांबारे यांच्यापुढे बुधवार दिनांक १३/३/२०१९ रोजी झाली. यावेळी शेतक-यांच्या वतीने बाजू मांडताना अॅड. राजेंद्र कुटे यांनी कोपरगाव तालुक्यात फक्त ३१८ मिमी एवढा पाऊस झालेला आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातील रब्बीची १६ गावे व खरीपाची ६३ गावे अशा एकूण ७९ गावांची आणेवारी ५० पैशाच्या आत आहे. कोपरगाव तालुक्याची खरीपाची सुधारित आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे ती अंतिम होण्यास अवधी लागणार असल्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेवून दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे. शासनाचे दिनांक २१ फेब्रुवारी २०१९ चे शासन निर्णयाप्रमाणे जून ते संप्टेंबर या कालवधीत ७५० मिमी पेक्षा कमी पर्जन्यमान झालेल्या व ५० पैशापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत. कोपरगाव तालुक्यातील सर्व गावांची आणेवारी हि ५० पैशापेक्षा कमी असल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील रवंदे, पोहेगाव, सुरेगाव, व कोपरगाव या महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची विनंती युवा नेते आशुतोष काळे यांनी आमरण उपोषण करण्यापूर्वी दिनांक १५/१०/२०१८ रोजी शासनाकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी कोपरगाव तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने कोपरगाव तालुक्यात दुष्काळ लागू करण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून व्हावी अशी विनंती राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समिती यांना दिनांक २३/१०/२०१८ रोजी केली होती. त्याचाही शासनाने विचार केला नाही. त्यामुळे युवा नेते आशुतोष काळे यांनी याचिकाकर्ते यांच्या वतीने दिनांक ८/३/२०१९ रोजी कोपरगाव तालुक्यातील रवंदे, पोहेगाव, सुरेगाव, व कोपरगाव या महसूल मंडळातील शेतक-यांच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्याची जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्याही मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी नाईलजास्तव न्यायालयात याचिका दाखल करावी लागली. मा. न्यायालयाने शासनास सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून संपूर्ण कोपरगाव तालुक्यात वरील निवेदनांच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेवून त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करावा असे निर्देश शासनाला दिले असल्याची माहिती युवा नेते आशुतोष काळे यांनी दिली असून त्यामुळे दुष्काळापासून वंचित राहिलेल्या चारही मंडळातील दुष्काळाच्या झळा सोसणा-या तालुक्यातील शेतक-यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram