दुष्काळ जाहीर करण्याच्या न्यायालयाच्या निर्देशामुळे दोन दिवस उपाशी राहिल्याचे चीज झाले – आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्याच्या शेजारील तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत सामावेश केला जातो व कोपरगाव तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असूनही कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीत वगळले गेले. त्यावेळी कोपरगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीत सामावेश होण्यासाठी निवेदन दिले,आंदोलन केली, आमरण उपोषणही केले. उपोषण सोडण्यासाठी शासनाच्या प्रतिनिधींनी आग्रह करून कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीत सामवेश करण्याचे आश्वासन दिले. त्या आश्वासनापोटी त्यावेळी फक्त दहेगाव मंडलात शासनाने दुष्काळ जाहीर केला. तर जिरायती भागातील शेतक-यांनादुष्काळ जाहीर व्हावा यासाठी रास्ता रोको, आमरण उपोषण अशा प्रकारे तीव्र आंदोलन करावे लागले. वास्तव परिस्थिती व शेतक-यांच्या जनप्रक्षोभामुळे या जिरायती भागातील तेरा गावात शासनाला दुष्काळ जाहीर करावा लागला. परंतु उर्वरित चार मंडलात दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी उपोषणावेळी शासनाच्या प्रतिनिधींनी तयार केलेल्या वास्तव परिस्थितीच्या अहवालाच्या आधारावर न्यायालयात धाव घेवून शेतक-यांच्या वतीने कैफियत मांडली. मा. न्यायालयाने वास्तव परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शासनाला कोपरगाव तालुक्यातील दुष्काळाच्या यादीतून वंचित राहिलेल्या रवंदे, पोहेगाव, सुरेगाव, व कोपरगाव मंडलामध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेवून त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करावा असे निर्देश दिले त्यामुळे दोन दिवस आमरण उपोषण करून उपाशी राहिलो त्याचे चीज झाले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील दुष्काळाच्या यादीतून वंचित राहिलेल्या रवंदे, पोहेगाव, सुरेगाव, व कोपरगाव मंडलामध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा असे निर्देश नुकतेच मा. न्यायालयाने शासनाला दिले आहे. त्यासाठी औरंगाबाद खंडपिठात शेतक-यांच्या वतीने पाठपुरावा करून चारही मंडलाच्या गावातील शेतक-यांना न्याय मिळवून दिला त्याबद्दल या गावातील शेतक-यांनी युवा नेते आशुतोष काळे यांचे आभार व्यक्त करून त्यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयामुळे दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आलेल्या कोपरगाव तालुक्यातील रवंदे, पोहेगाव, सुरेगाव, व कोपरगाव या मंडलातील शेतक-यांना व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला याचे मोठे समाधान आहे. शेतक-यांनी न्यायालयाच्या निर्णयामुळे तालुक्यातील शेतक-यांनी केलेले अभिनंदन व आशिर्वाद प्रेरणा देणारे असून कोपरगाव तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नवीन उर्जा मिळाली आहे.यापूर्वीही आपण रब्बीच्या अनुदान मिळावे यासाठी न्यायालयीन लढाई लढत असून आपल्याला त्या लढाईतसुद्धा अपेक्षित यश मिळणार असल्याचे सांगितले. दुष्काळ जाहीर करा असे जनतेला सांगावे लागते. त्यासाठी युवा नेतृत्वाला आमरण उपोषणाला बसावे लागते हे तालुक्याचे दुर्देव आहे. शासनाचे प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी ठराविक लोकांसाठीच काम करत असून आशुतोष काळे मात्र संपूर्ण कोपरगाव तालुक्यासाठी काम करीत आहे. आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवले गेले परंतु दुष्काळ जाहीर झाल्यामुळे स्वकर्तृत्वावर आशुतोष काळे यांनी हक्क मिळवून दिला. त्यामुळे दिवाळी साजरी करण्याची वेळ आली असली तरी यावेळचा गुढीपाडवा तुमच्या नावाने गुढी उभारू असे शेतक-यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. याप्रसंगी कर्मवीर काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील शिंदे,छबूराव आव्हाड, सभापती सौ.अनुसया होन, उपसभापती अनिल कदम,कारभारी आगवन,संचालक पद्मकांत कुदळे,ज्ञानदेव मांजरे, विठ्ठलराव आसने,सुधाकर रोहोम,हरिभाऊ शिंदे, अरुनराव चंद्रे,संजय आगवन, आनंदराव चव्हाण,राजेंद्र मेहेरखांब,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माधवराव खिलारी, कोपरगाव शहराध्यक्ष सुनील गंगूले, पंचायत समिती सदस्य गटनेते अर्जुनराव काळे,श्रावण आसणे,मधुकर टेके,बाजार समितीचे उपसभापती राजू निकोले, जिनिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ अभिजित आचारी, रोहिदास होन,निलेश उदावंत,धरमशेठ बागरेचा,प्रसाद साबळे,रमेश गवळी,राजेंद्र खिलारी,गौतम बँकेचे व्हा.चेअरमन साहेबलाल शेख,राहुल रोहमारे,मढीच्या सरपंच सौ.वैशाली आभाळे, नगरसेवक,गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, हिरामण गंगूले,अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे,मनीष शहा,मनसे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड कोपरगाव तालुक्यातील व्यापारी, शेतकरी वं नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram