कैलास माळी यांचा आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार

कोपरगाव तालुक्यातील चासनळीचे माजी सरपंच कैलास माळी यांची नुकतीच आदिवासी मागासवर्गीय कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. लोकहितवादी, बहुजनवादी कामगारांच्या हक्कासाठी लढणा-या मागासवर्गीय महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कैलास माळी यांना संघटनेचे कार्याध्यक्ष शरद जावळे यांनी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी नुकताच त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. . कामगार चळवळीच्या माध्यमातून समाजवादी, नागरिकांना सोबत घेवून आदिवासी व मागासवर्गीय कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी सोमनाथ चांदगुडे, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे,माजी सरपंच संदीप जाधव, राजेंद्र नवले,शरद जावळे, बाळासाहेब ठाकरे, प्रकाश माळी, आण्णा चांदगुडे, आण्णा धेनक, निलेश ब्राम्हणे,संदीप हारणे, संजय माळी, अर्जुन वाघ, बाळू हिंगमिरे, अजय माळी, बापू कासोदे आदी मान्यवरांसह एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram