रवंदे, पोहेगाव, सुरेगाव व कोपरगाव मंडलात दुष्काळ सवलती तात्काळ लागू करा आशुतोष काळेंचे कृषी आयुक्तांना साकडे

कोपरगाव तालुक्यातील रवंदे, पोहेगाव, सुरेगाव व कोपरगाव या महसूल मंडलात दुष्काळ जाहीर करावा यासाठी या गावातील शेतकऱ्यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेची सुनावणी होवून या चारही मंडलामध्ये दुष्काळ जाहीर करावा असे आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिले होते. दुष्काळाच्या भीषण परिस्थितीत नागरिकांना दुष्काळी सवलती तातडीने लागू व्हाव्या या दृष्टीकोनातून युवा नेते आशुतोष काळे यांनी याचिकाकर्ते शेतक-यांना सोबत घेवून कृषी आयुक्त तथा दुष्काळ देखरेख समितीचे अध्यक्ष सुहास दिवसे यांची पुणे येथे त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेत निवेदन दिले. त्यांना कोपरगाव तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीची माहिती देऊन न्यायालयाच्या आदेशानुसार या चारही मंडलात दुष्काळाच्या सवलती तात्काळ लागू कराव्यात असे साकडे घातले. पर्जन्य छायेखाली येत असलेल्या कोपरगाव तालुक्यात दरवर्षी अतिशय कमी पाऊस पडतो. यावर्षी तर कोपरगाव तालुक्यात आतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे संपूर्ण कोपरगाव तालुक्यात दुष्काळाची अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. कोपरगाव तालुक्याच्या शेजारील तालुक्यामध्ये शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. परंतु कोपरगाव तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यावेळी युवा नेतेआशुतोष काळे यांनी आमरण उपोषण केले होते. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील फक्त दहेगाव मंडलात शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला. कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको, उपोषण आदी आंदोलन करून त्यांच्या भागातील गावांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यासाठी भाग पाडले. परंतु कोपरगाव तालुक्यातील इतर चारही मंडलातील आणेवारी हि पन्नास पैशाच्या आत असून सर्वत्र दुष्काळाची भयावह परिस्थिती होती. त्यामुळे या भागातील शेतकरी सुनिल शिंदे, विठ्ठलराव आसने, केशवराव जावळे यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दुष्काळ जाहीर व्हावा अशा आशयाची याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सादर करण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर व वास्तव परिस्थितीचा विचार करून कोपरगाव तालुक्यातील रवंदे, पोहेगाव, सुरेगाव व कोपरगाव महसूल मंडलात दुष्काळ जाहीर करावा असे आदेश प्रशासनाला दिले होते. मा.न्यायालयाच्या आदेशानुसार दुष्काळात होरपळत असलेल्या कोपरगाव तालुक्यातील रवंदे, पोहेगाव, सुरेगाव व कोपरगाव या महसूल मंडलातील शेतक-यांना व सर्वसमान्य जनतेला दुष्काळाच्या सवलती तात्काळ लागू करून दुष्काळाची दाहकता कमी व्हावी यासाठी शेतकऱ्यांसमवेत कृषी आयुक्त तथा दुष्काळ देखरेख समितीचे अध्यक्ष सुहास दिवसे यांची भेट घेतली असल्याचे आशुतोष काळे यांनी संगितले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram