शिर्डी लोकसभेचे आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या सभांना कोपरगाव तालुक्यात मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

अखिल भारतीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी अंगार पक्ष, आर.पी.आय.(कवाडे गट) व आघाडी मित्र पक्षाचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या सभांना कोपरगाव तालुक्यातील मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांचा दांडगा जनसंपर्क असलेल्या कोपरगाव तालुक्यात आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचार सभा सुरु आहे. लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे, आमदार डॉ.सुधीर तांबे, युवा नेते आशुतोष काळे हे मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत असून कोपरगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांच्या प्रचार सभांचा मोठा धडाका सुरु आहे. शेतकऱ्यांच्या शेती मालाला भाव मिळत नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमुळे अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्ता मिळविलेल्या भाजपा सरकारने देशाच्या जनतेचा भ्रमनिरास केलेला आहे. वाढलेली महागाई, युवा वर्गाच्या रोजगारीचा प्रश्न, भाजप सरकार सोडवू शकले नाही. त्यामुळे जनता या सरकारला वैतागलेली दिसत असल्याचे प्रचार सभांना होणाऱ्या गर्दीवरून जाणवत आहे. या प्रचार सभेच्या निमित्ताने बोलतांना आशुतोष काळे म्हणाले की, भाऊसाहेब कांबळे यांच्या रूपाने आपल्या हक्काचा खासदार कोपरगाव तालुक्याला मिळणार आहे. कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण देशात सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. कोपरगाव तालुक्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मोठी ताकत निर्माण झाली आहे. त्या ताकतीच्या जोरावर कोपरगाव तालुक्याची जास्तीतजास्त मताधिक्य देण्याची आपली जबाबदारी आहे त्यासाठी सर्वांनी अंग झटकून कामाला लागावे असे आवाहन केले. आमदार अभौसाहेब कांबळे म्हणाले की, कोपरगाव तालुक्याच्या जनतेने आपल्याला कधीही हाक मारावी आपण त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू व जनतेच्या सुखदुखात सदैव तुमच्या सोबत राहण्याची ग्वाही दिली. आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, या भागातील खासदार निवडून आल्यानंतर कधी मतदार संघात फिरकलेच नाहीत. खासदार दाखवा व एक हजार रुपये मिळवा असे जनता उदिग्न होऊन बोलत असल्याचे सांगितले. या प्रचार सभा प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, राष्ट्रवादीचे कोपरगाव तालुका अध्यक्ष माधवराव खिलारी उपस्थित निवडणूकीचे वारे कोपरगाव तालुक्यात जोरदारपणे वाहत असून आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. कोपरगाव तालुक्याच्या युवा वर्गाच्या गळ्यातील ताईत असलेले युवा नेते आशुतोष काळे यांची आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना मोठी मदत मिळत आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात आघाडीच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळणार आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram