कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

कोसाका उद्योगाचे समुहाचे संस्थापक शिक्षण महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांची ९८ वी जयंती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतमनगर येथे साजरी करण्यात आली. यावेळी कर्मवीर शंकररावजी काळे यांना अभिवादन करण्यासाठी कोसाका उद्योग समूह व सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, पदाधिकारी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत अथक परिश्रमातून केलेल्या सहकार, शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे, कर्मवीर शंकररावजी काळे यांचे जावई अनिलराव शिंदे (अमेरिका), कन्या सौ. स्नेहलताई शिंदे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, युवा नेते आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे, जेष्ठ नेते छबुराव आव्हाड, कारभारी जाधव, लहानुभाऊ नागरे, सुधाकर आवारे, अॅड. प्रमोद जगताप,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, सेक्रेटरी सुनील कोल्हे, ऑफिस सुपरिटेंडेट बाबा सय्यद, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायण मांजरे, राधाबाई काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील,सतीश कृष्णानी, विजयराव आढाव, रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहावर प्रेम करणारे हितचिंतक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram