वैद्यकीय शिबिरातून गरजू रुग्णांना मोठी मदत – आशुतोष काळे

आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. त्यासाठी वेळोवेळी आवश्यक असणा-या आरोग्याच्या तपासण्या आपण केल्या पाहिजेत. त्यामुळे कोणत्याही आजाराचे लवकर निदान होऊन योग्य ते उपचार घेतल्यास रुग्ण लवकर व्याधीमुक्त होऊन सर्वसामान्यांप्रमाणे जीवन व्यतीत करू शकतात परंतु सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीमुळे आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊ शकत नाही व विविध आजाराच्या तपासण्याही करीत नाही त्यामुळे त्यांना भविष्यात मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. अशा गरजू रुग्णांसाठी कर्मवीर प्रतिष्टानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले हृदयरोग तपासणी शिबीर अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. अशा वैद्यकीय शिबिरातून गरजू रुग्णांना मोठी मदत मिळत असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. शिक्षणमहर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर प्रतिष्ठान कोपरगाव व मॅग्नम हार्ट इंस्टिट्यूट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी धर्मशाळा कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या हृदयरोग तपासणी शिबीर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या शिबिरामध्ये प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ.मनोज चोपडा यांनी ई.सी.जी. रक्तशर्करा तसेच हृदयरोगा संबंधिच्या सर्व तपासण्या मोफत करून हृदयाच्या तक्रारी असणा-या रुग्णांना अनमोल मार्गदर्शन केले. या हृदयरोग तपासणी शिबिरामध्ये डॉ.मनोज चोपडा व त्यांचे सहकारी डॉ.राजेंद्र पावडे, डॉ.कौशिक ठाकूर, डॉ.मोनिका जगताप, डॉ.मधुकर पवार, डॉ.नंदलाल तिवारी यांनी एकूण २२८ रुगांची तपासणी केली. याप्रसंगी विजयराव आढाव, संदीप वर्पे, सुनिल गंगुले, नगरसेवक विरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, सुनील शिलेदार, डॉ.चंद्रशेखर आव्हाड, दिनकर खरे, फाकीरमामू कुरेशी, संतोष चवंडके, दीपक साळुंके, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, सचिन बढे, मुकुंद इंगळे, संदीप सावतडकर, प्रा.अंबादास वडांगळे, राहुल रोहमारे, नंदकुमार डांगे, बाळासाहेब रुईकर, मुकुंद भुतडा, विशाल निकम, राजेंद्र खैरनार, संतोष शेलार, लवांडे सर, हसन कुरेशी, राहुल देवळालीकर, नितीन बनसोडे, पवन भुतडा, चंद्रशेखर म्हस्के, वाल्मिक लाहिरे आदी मान्यवरांसह कर्मवीर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram