विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगाचे प्रेरणास्थान – आशुतोष काळे

शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा असा बहुमोल संदेश देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समानतेची शिकवण दिली. त्याचबरोबर स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक असामान्य, अलौकिक व वंदनीय व्यक्तिमत्व होते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ आपल्या भारत देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित कोपरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास युवा नेते आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मंदार पहाडे, सुनिल शिलेदार, संदीप पगारे, हिरामण गंगूले, राजेंद्र वाघचौरे, राऊसाहेब साठे, नितीन त्रिभुवन, फकीरमामू कुरेशी, बाळासाहेब सोनवणे, डॉ.रोकडे, प्रकाश दुशिंग,राजेंद्र खैरनार, बापू वढणे, अॅड.मनोज कडू, विकास बेंद्रे, विजय चवंडके, निखिल डांगे, अजीज शेख, दिनकर खरे, संतोष टोरपे,आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram