भगवान महावीरांचे विचार समाजाला सन्मार्ग दाखवितात - आशुतोष काळे

जैन धर्मियांचे २४ वे तीर्थकार सत्य, अहिंसेंचे पुजारी भगवान महावीरांनी समाजाच्या सुखासाठी संसाराचा त्याग करून कठोर तपश्चर्या केली. अहिंसा हाच मोठा धर्म आहे. ‘जगा आणि जगू द्या’ असा संदेश महावीरांनी दिला. आजही भगवान महावीरांचे विचार समाजाला सन्मार्ग दाखवीत असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात जैन धर्मियांच्या वतीने मोठया भक्तीपूर्ण उत्साहात भगवान महावीरांची जयंती साजरी करण्यात आली. सजविलेल्या पालखीतून भगवान महावीरांची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भगवान महावीरांच्या पालखीचे युवा नेते आशुतोष काळे यांनी पूजन करून मनोभावे दर्शन घेतले याप्रसंगी ते बोलत होते. पालखीत सहभागी झालेल्या सर्व जैन बंधुभगिनींना महावीर जयंतीच्या आशुतोष काळे यांनी शुभेच्छा दिल्या. कोपरगाव शहरात निघालेल्या भगवान महावीरांच्या मिरवणुकीने समस्त कोपरगाव वासियांचे लक्ष वेधून घेतले होते. मिरवणुकीमध्ये जय महावीर, जय महावीर च्या घोषणेने संपूर्ण कोपरगाव शहर भक्तीमय वातावरणात यावेळी न्हावून निघाला. याप्रसंगी अतुलशेठ काले, नगरसेवक मंदार पहाडे, जैन समाजाचे पंच संतोष गंगवाल, चंद्रकांत कासलीवाल, रवींद्र लोहाडे, प्रवीण लोहाडे, सी.डी. ठोळे, धनराजशेठ बागरेचा, पेमराज भंडारी, पियुष गंगवाल, मुन्ना पाटणी तसेच सर्व समाजाचे ट्रस्टी व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram