कोपरगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार - आशुतोष काळे

कोपरगाव शहराचा बिकट झालेला पाणीप्रश्न सोडविण्यासाठी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येसगाव साठवण तलावातील गाळ काढण्यासाठी कोपरगावचे नागरिक श्रमदान करीत आहे. या तलावातील साचलेला गाळ तातडीने काढण्यासाठी पोकलँड मशीन उपलब्ध करून दिले असुन यापुढेही कोपरगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. कोपरगावच्या नागरिकांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागावा यासाठी चार नंबर साठवण तलावाच्या विस्तारीकरण कामासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी २ कोटी रुपयांचा निधी आणला होता परंतु श्रेयवादातून सत्ताधाऱ्यांनी हा निधी अखर्चित ठेवल्यामुळे हा निधी परत गेला. कोपरगाव शहराचा पिण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सातत्याने साठवण तलाव क्रमांक ४ चे काम तातडीने पूर्ण करावे व ५ नंबर साठवण तलावाचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करावे यासाठी आंदोलन, उपोषण करीत आले आहे. परंतु प्रशासनाने त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे मागील वर्षीच्या उन्हाळ्यात २३ दिवसाआड व यावर्षीच्या उन्हाळ्यात १५ दिवसांनी नागरिकांना पाणी मिळत आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावामध्ये गाळ साचल्यामुळे तलावांच्या साठवण क्षमता कमी झाल्या आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही शासन व सत्ताधाऱ्यांकडून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊले उचलले न गेल्यामुळे कोपरगावच्या नागरिकांचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी मी न्यायालयात दाद मागितली आहे. मागील चार वर्षापासून साठवण तलावाची क्षमता वाढावी यासाठी मी प्रयत्न करीत असून आजपर्यंत ३ जिल्हाधिकाऱ्यांना साठवण तलावाच्या बाबतीत निवेदन दिले असल्याचे आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. साठवण तलावामध्ये पोकलँड मशिनच्या सहाय्याने गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली असून याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाकार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हिरामण गंगुले, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे आदी उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram