आशुतोष काळेंनी दिलेल्या पोकलँड मशिनमुळे साठवण तलावातील गाळ काढण्याच्या कामाला वेग

कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येसगाव येथील साठवण तलावाची साठवण क्षमता कमी झाल्यामुळे शहरातील नागरिकांनी श्रमदानातून गाळ काढण्यास सुरुवात केली होती. सामाजिक बांधिलकी जोपासून युवा नेते आशुतोष काळे यांनी साठवण तलावातील गाळ काढण्यासाठी पोकलँड मशिन उपलब्ध करून दिल्यामुळे साठवण तलावातील गाळ काढण्याच्या कामाला प्रचंड वेग आला आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी स्वत: साठवण तलावाचे ठिकाणी समक्ष जावून गाळ काढण्याच्या कामाची माहिती नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडून जाणून घेतली. भविष्यात कोपरगावच्या नागरिकांवर अशी वेळ येवू नये यासाठी पालिका प्रशासनाणे योग्य ती काळजी घ्यावी.युवा नेते आशुतोष काळे यांच्या माध्यमातून यापुढेही पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कोपरगाव शहराला ४ साठवण तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु मागील काही वर्षापासून या चारही साठवण तलावात मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाल्यामुळे साठवण तलावाची क्षमता कमी झाली होती. त्यामुळे कोपरगावच्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जाण्याची बाब नित्याचीच झाली होती. यावर्षी उन्हाळ्यात साठवण तलावात अतिशय कमी पाणीसाठा असल्यामुळे नागरिकांना १२ दिवसांनी पाणी देण्याचा नगरपरिषद प्रशासनाने निर्णय घेतला होता. परंतु नागरिकांना १२ दिवस उलटूनही पाणी मिळत नव्हते. साठवण तलावातील गाळ काढल्यास साठवण तलावाची क्षमता वाढू शकते. या उद्देशातून शहरातील समाजसेवी संस्थांनी लोकसहभागातून श्रमदान करून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत गाळ काढण्यास प्रारंभ केला होता. परंतु केवळ श्रमदानातुनच या तलावातील गाळ काढणे सहजासहजी शक्य नसल्यामुळे व उन्हाची तीव्रताही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे युवा नेते आशुतोष काळे यांनी साठवण तलावातील गाळ काढण्यासाठी २ तारखेपासून पोकलँड मशिन दिलेले आहे. त्यामुळे मागील पाच दिवस या पोकलँड मशिनच्या सहाय्याने अहोरात्र साठवण तलावातील गाळ काढण्यास मोठी मदत झाली आहे. आजपर्यंत साठवण तलावातील निम्म्यापेक्षा जास्त गाळ काढण्यात आला असून जोपर्यंत गोदावरी कालव्यांना पाणी येत नाही तोपर्यंत या पोकलँड मशिनच्या सहाय्याने गाळ काढण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे सौ.चैतालीताई काळे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते, विरेन बोरावके, मंदार पहाडे,सौ. प्रतिभाताई शिलेदार, सौ. माधवीताई वाकचौरे,संदीप पगारे,हिरामण गंगुले, सुनील शिलेदार,अजीज शेख, फकीरमामू कुरेशी, संदीप कपिले, बाळासाहेब सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram