श्री.भगवान विष्णू महाराज काळे कारखाना व उद्योग समूहाला प्रेरणा देणारे आराध्य दैवत- मा.आ.अशोकराव काळे

वैकुंठवासी तुकारामबाबा खेडलेकर यांच्या प्रेरणेतून धार्मिक वृत्ती जोपासणाऱ्या माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी १९६९ साली कारखाना कार्यस्थळावर श्री.भगवान विष्णू मूर्तीची प्रतिष्ठापना केली तेव्हापासून या उद्योग समूहाची भरभराट झाली. आज या श्री.भगवान विष्णू मंदिराच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त मला भगवान विष्णुंची पाद्यपूजा करण्याचे भाग्य मला मिळाले याचे मनस्वी खूप मोठे समाधान मिळाले असून श्री.भगवान विष्णू महाराज कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाला प्रेरणा देणारे आराध्य दैवत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अशोकराव काळे यांनी केले. यावेळी युवा नेते आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचे संकट टळू दे, सर्वत्र भरपूर पर्जन्यमान होऊन शेतकरी राजा सुखी होऊ दे अशी श्री. भगवान विष्णू चरणी पार्थना केली. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील श्री भगवान विष्णू मंदिराच्या सुवर्णमहोत्सवी ५० व्या वर्धापन दिनानिमित्त माजी आमदार अशोकराव काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते श्री.भगवान विष्णू मूर्तीचे पूजन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे,आयांश काळे, तसेच सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, सेक्रेटरी सुनील कोल्हे, ऑफिस सुपरिटेडेट बी. बी. सय्यद तसेच सर्व पदाधिकारी व श्री भगवान विष्णू मंदिर कमिटीचे कार्याध्यक्ष अध्यक्ष व सर्व पदाधिकारी या महापूजा प्रसंगी उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त या वेळेत ह.भ.प. रघुनाथ महाराज खटाने यांचे जाहीर हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram