भगवान बुद्धांच्या विचारांनी जीवन मार्ग सुखकर - आशुतोष काळे

भगवान गौतम बुद्ध एक थोर समाज सुधारक व समतेचे महान उपदेशक होते.त्यांना जातिभेद मान्य नव्हता. भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सदाचार शिकवणारे पहिले महापुरुष भगवान बुद्ध होते.भगवान बुद्धांनी दिलेल्या अहिंसा व शांतीच्या विचारांची आज संपूर्ण जगाला गरज आहे.भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये संसारातील दुःखातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग असून भगवान बुद्धांच्या विचारांवर जर सर्वांनी मार्गक्रमण केले तर या जगात कोणीही दुःखी राहणार नसून भगवान बुद्धांच्या विचारांनी जीवन मार्ग सुखकर होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. भगवान बुद्धजयंती निमित्त कोपरगाव शहरातील लुंबिनी बुद्ध विहार येथे बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी युवा नेते आशुतोष काळे यांनी भगवान बुद्धांचे प्रतिमेस अभिवादन करून समाज बांधवांना भगवान बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी यावेळी भिक्खू आनंद सुमनसिरी, भिक्खू धम्म रत्न, भन्ते कश्यप, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, संदीप पगारे,मंदार पहाडे, सुनील शिलेदार, राजाभाऊ वाकचौरे, हिरामण गंगुले, अजीज शेख, नवाज कुरेशी, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, दिनकर खरे, नितीन त्रिभुवन, नितीन बनसोडे, राजेंद्र आभाळे, विजय चवंडके, गणेश लकारे, अँड. मनोज कडू,दिनेश पवार, मुकुंद इंगळे, समीर वर्पे,रविंद्र राऊत,नितीन शिंदे, हारून शेख,प्रसाद उदावंत, वाल्मिक लाहीरे,विजय नागरे, हर्षल जयस्वाल, संदीप कपिले, विकास बेंद्रे, सुरेंद्र बैरागी, महेश उदावंत, किशोर वाघ आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच शरद खरात, साहेबराव कोपरे, संपतराव भारुड, रणशूर साहेब, अनिल बनसोडे,विजय त्रिभुवन, नितीन शिंदे, झोडगे सर, संजय विघे, वसंत गाडे, राहुल धीवर आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गोविंद पगारे व शामराव हुसळे यांनी लुंबिनी बुद्धविहाराच्या संरक्षक भिंतीच्या कामासाठी मदत केल्याबद्दल बुद्ध धर्म प्रसारक मंडळ ट्रस्टच्या वतीने त्यांचे आभार मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram