कोणी काय केल यापेक्षा तलावाचे काम कधी सुरु करणार ते सांगा -आशुतोष काळे

कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार व पाच नंबर साठवण तलावाचे काम त्वरित सुरु करावे अन्यथा आपण सोमवार दिनांक २७/५/२०१९ रोजी धरणे आंदोलन करणार असल्याचा ईशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिलेल्या पत्रात दिला होता. यापूर्वीही आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अनेक वेळा आंदोलने केली आहेत. या केलेल्या आंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसादही मिळालेला आहे.त्यामुळे सोमवार दिनांक २७/५/२०१९ रोजी होणाऱ्या आशुतोष काळे यांचे धरणे आंदोलनाचा धसका घेत शिर्डीचे प्रांताधिकारी रमेश शिंदे यांच्या उपास्थितीत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी चार व पाच नंबर साठवण तलावाचे कामाबाबत तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला युवा नेते आशुतोष काळे, तालुक्याच्या लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, सामजिक कार्यकर्ते तसेच प्रांताधिकारी रमेश शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आदी उपस्थित होते. या बैठकीत कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ४ व ५ क्रमांकाच्या साठवण तलावाचे काम त्वरित सुरू करण्यासाठी चर्चा करण्यापेक्षा तालुक्याच्या आमदार व नगराध्यक्ष यांनी मुख्य विषयाला बगल देत एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची सुंदोपसुंदी सुरु केली. त्यावेळी युवानेते आशुतोषदादा काळे यांनी आक्रमक पवित्रा घेत आजपर्यंत चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरणाचे व नवीन पाच नंबर साठवण तलावाचे काम का सुरु होवू शकले नाही. तुम्ही आजपर्यंत काय केले हे सांगू नका त्यापेक्षा साठवण तलाव कधी होणार हे सांगा असे खडे बोल सुनावले. मात्र उपस्थितांपैकी कोणीही साठवण तलावाचे काम कधी सुरु करणार याबाबत ठोस आश्वासन देवू न शकल्यामुळे आशुतोष काळे धडक कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर धरणे आंदोलनाला जावून बसले. दुपारी आंदोलनस्थळी प्रांताधिकारी रमेश शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे तसेच व गायत्री कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधींनी आशुतोष काळे यांची भेट घेवून साठवण तलाव क्रमांक ४ व ५ चे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी युवानेते आशुतोष काळे यांनी पुन्हा आक्रमक होत आम्ही आता कोणत्याही आश्वासनांना बळी पडणार नाही. समृद्धी महामार्गाचे काम घेतलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीने कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी येसगाव येथील २७ एकर जागेत ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरू करण्यासाठी अनुकूलता दर्शवली होती. परंतु आता नियमांची कारणे देत गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनी हे काम करण्यासाठी विलंब करीत आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून तातडीने साठवण तलावाचे काम सुरु करावे अशी आग्रही मागणी लावून धरली. ****चौकट**** आशुतोष काळे आक्रमक - जर आठ दिवसात गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीने साठवण तलावाचे काम सुरू केले नाही तर गायत्री कन्स्ट्रक्शनचे कोपरगाव तालुक्यात सुरू असलेले समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडू असा सज्जड ईशारा प्रशासनाला दिला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, विजयराव आढाव,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगुले, शहर युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, चारुदत्त सिनगर,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे, संदिप पगारे, सौ. प्रतिभा शिलेदार,सौ. वर्षा कहार, सौ. माधवी वाकचौरे, मायादेवी खरे,सुनिल शिलेदार,अजीज शेख, कृष्णा आढाव, संतोष चवंडके, रावसाहेब साठे,सचिन परदेशी, संदीप कपिले, वाल्मिक लाहीरे,राहुल देवळालीकर, अंबादास वडांगळे, डॉ. चन्द्रशेखर आव्हाड, विद्यासागर शिंदे, दिनकर खरे, फकीरमामू कुरेशी, समीर वर्पे.राजेंद्र आभाळे,राजेंद्र बोरावके, रमेश गवळी, मुकुंद इंगळे, रशीद शेख, प्रकाश दुशिंग, विजय चवंडके, गणेश लकारे, निलेश पाखरे, दिनेश पवार, बाळसाहेब पवार, रवी राऊत, चांदभाई पठाण, गोरख पंडोरे, एकनाथ गंगुले, संदीप सावतडकर,चन्द्रशेखर म्हस्के, निखील डांगे,काकासाहेब कोरडे, राजेंद्र वैराळ, राजेंद्र खैरनार, नारायण लांडगे, दिनेश संत, तुषार सरोदे, विजय शिंदे, बाळासाहेब शिंदे, विकास बेंद्रे, विजय चवंडके अॅड.मनोज कडू, रमेश गवळी, राजेंद्र जोशी, संतोष शेलार, रघुनाथ मोरे, बाळासाहेब शिंदे, हारुण शेख, शिवा लकारे, बाळासाहेब रुईकर, दिनेश पवार, ऋषिकेश खैरनार, योगेश नरोडे, विजय दाभाडे, बाळासाहेब सोनटक्के, गोरख पंडोरे, गणेश लकारे, धनंजय कहार, संतोष टोरपे, तेजस साबळे, आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram