साठवण तलावाच्या बाबतीत तोडगा निघत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार – आशुतोष काळे

कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार नंबर व पाच नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरु करण्याबाबत आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक २७/५/२०१९ पासून सुरु झालेले धरणे आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. जोपर्यंत साठवण तलावाच्या कामाच्या बाबतीत ठोस तोडगा निघत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला असून आंदोलनाच्या सलग तिसऱ्या दिवशी जिवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या कोपरगावच्या सर्वसामान्य नागरिकांनी धरणे आंदोलनस्थळी येवून धरणे आंदोलनाला पाठींबा दिल्यामुळे धरणे आंदोलांची धार वाढली आहे. त्याचबरोबर कोपरगाव शहरातील अनेक सामाजिक संघटणांनीही आंदोलन स्थळी येवून धरणे आंदोलानाला आपला पाठींबा दिला आहे. चालू वर्षीच्या उन्हाळ्यात कोपरगाव नगरपरिषदेकडून कोपरगावच्या नागरिकांना १२ दिवासांनी पाणी पुरवठा करण्यात आला. भविष्यात कोपरगावच्या नागरिकांना अशा पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी मागील काही वर्षापासून आशुतोष काळे यांनी चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरण व नवीन पाच नंबर साठवण तलावाचे कामाचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावा अशी आग्रही मागणी लावून धरली होती. पाच नंबर साठवण तलावाचे काम करण्याची तयारी दाखविलेल्या समृद्धी महामार्गाचे ठेकेदार असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीनेही साठवण तलावाचे काम करण्यासाठी मागील काही महिन्यापासून सुरु केलेली टाळाटाळ यामुळे साठवण तलावाचे काम सुरु होण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना साठवण तलावाचे काम सुरु करण्याच्या बाबतीत तातडीने निर्णय घेवून काम त्वरित सुरु करावे अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे लेखी निवेदन दिले होते. साठवण तलावाच्या बाबतीत कोणताही निर्णय न झाल्यामुळे सोमवार दिनांक २७/५/२०१९ पासून आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व कोपरगाव शहरातील नागरिकांसमवेत धरणे आंदोलन सुरु केले. त्या धरणे आंदोलनाची दखल घेत सोमवार दिनांक २७/५/२०१९ रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत तसेच मंगळवार दिनांक २८/५/२०१९ रोजी युवा नेते आशुतोष काळे यांची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजर तात्याराव डुंगा यांच्या समवेत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत साठवण तलावाच्या बाबतीत कोपरगाव नगरपरिषदेची उदासीनता व गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीवर असलेल्या राजकीय दबावामुळे कोणताही समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे जोपर्यंत साठवण तलावाचे कामाच्या बाबतीत योग्य तोडगा निघणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही व धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा आशुतोष काळे यांनी घेतला असून साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी यापेक्षाही जास्त आक्रमक आंदोलन करण्याचा ईशारा आशुतोष काळे यांनी प्रशासनाला दिला आहे. शुक्रवार दिनांक ३१/५/२०१९ रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीकडे कोपरगावच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे. ज्याप्रमाणे आशुतोष काळेंच्या आमरण उपोषणाला कोपरगाव शहरासह तालुक्याच्या जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याप्रमाणेच धरणे आंदोलनालाही कोपरगाव शहरातून मोठा पाठींबा मिळत आहे. धरणे आंदोलनाला कोपरगाव शहरातील सर्व सामान्य नागरिकांसह लोकस्वराज्य संघटना, व्यापारी महासंघ व लायन्स क्लब, जैन महावीर समाज कोपरगाव, लायनेस क्लब कोपरगाव, कोपरगाव वकील महासंघ, वंचित बहुजन आघाडी कोपरगाव, हमाल पंचायत कोपरगाव, शीख समुदाय, लायन्स क्लब महिला, रयत सेवक मित्र मंडळ कोपरगाव, लाड सुवर्णकार समाज कोपरगाव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मेडिकल असोसिएशन संघटना आदी संघटणांनी पाठींबा दिला आहे. आज धरणे आंदोलनाला तिसऱ्या दिवशी माजी आमदार अशोकराव काळे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व कोपरगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram