आशुतोष काळेंच्या आवाहनाला कोपरगावच्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोपरगाव शहरात कडकडीत बंद

कोपरगाव शहरातील चार नंबर व पाच नंबर साठवण तलावाचे काम त्वरित सुरु करावे यासाठी आशुतोष काळे यांनी मागील पाच दिवसापासून धरणे आंदोलन सुरु ठेवले आहे. साठवण तलाव क्रमांक पाच चे काम करण्यासाठी सहमत असलेल्या गायत्री कंस्ट्रक्शन कंपनीवर राजकीय दबाव आल्यामुळे या कंपनीने साठवण तलावाचे काम सुरु करण्याबाबत असमर्थता दाखविली असून तसेच चार नंबर व पाच नंबर साठवण तलावाच्या कामाचे अंदाजपत्रक कोपरगाव नगरपरिषदेणे तयार न केल्याच्या निषेधार्थ आशुतोष काळे यांनी कोपरगावच्या नागरिकांना ३१/५/२०१९ रोजी कोपरगाव शहर बंदचे आवाहन केले होते. आशुतोष काळेंच्या आवाहनाला कोपरगाव शहरातील व्यापारी, सर्व सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फुर्तपणे मोठया प्रमाणात प्रतिसाद देत कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळला.कोपरगाव तालुक्याच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधी कोपरगाव शहराच्या पाणी टंचाईला जबाबदार असून पाच नंबर साठवण तलावाचे काम करण्यास नकार घंटा वाजवित आहे. येत्या दोन दिवसात निर्णय न झाल्यास गायत्री कंस्ट्रक्शन कंपनी करीत असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम सोमवार दिनांक ३/६/२०१९ पासून बंद पाडणार असल्याचा यल्गार आशुतोष काळे यांनी पुकारला आहे. कोपरगाव शहराच्या नागरिकांना आवश्यक असलेले पाणी आरक्षित असूनही केवळ साठवण तलाव क्षमता कमी असल्यामुळे कोपरगावच्या नागरिकांना दरवर्षी मोठया पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पाणी टंचाईचा मोठा परिणाम कोपरगावच्या बाजारपेठेवर झाला असून कोपरगावची बाजारपेठ ओस पडली आहे. महिला भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण कायम स्वरूपी थांबावी यावर तोडगा काढण्यासाठी आशुतोष काळे यांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर हात घातला आहे. सुरु असलेले धरणे आंदोलन आपल्यासाठीच सुरु असल्याची जाणीव झालेल्या कोपरगावच्या सुज्ञ नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळला. कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी, सामाजिक संघटना व कोपरगावचे नागरिक बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे बंद १०० टक्के यशस्वी झाला आहे. आशुतोष काळेंच्या धरणे आंदोलनाचा (दि. ३१) रोजी पाचवा दिवस होता. कुणाला काय राजकारण करायचे ते करू दया. शहरातील जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी आशुतोष काळे यांनी उभारलेल्या लढयामध्ये सर्व कोपरगाव नागरिक सहभागी होऊन बंद मध्ये सहभाग नोंदविला. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या नागरिकांचा पाणी प्रश्न सोडवून कोपरगाव शहराला पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यावे अशा प्रतिक्रिया सर्व सामान्य नागरिकांनी धरणे आंदोलन स्थळी येवून व्यक्त केल्या. यावेळी दिलेल्या आवाहनाला कोपरगावच्या नागरिकांनी पाठींबा देवून बंद यशस्वी केल्याबद्दल आशुतोष काळे यांनी कोपरगावच्या नागरिकांचे आभार मानले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram