आशुतोष काळेंच्या धरणे आंदोलनाच्या सहाव्या दिवशी कोपरगावच्या विविध संघटनांचे तहसीलदारांना निवेदन

कोपरगाव शहराच्या साठवण तलाव क्रमांक ५ चे काम करण्यास गायत्री कंस्ट्रक्शन कंपनीवर आलेल्या राजकीय दबावापोटी ही कंपनीने साठवण तलाव क्रमांक ५ चे काम सुरु न केल्यामुळे व कोपरगाव नगरपरिषदेणे चार नंबर व पाच नंबर साठवण तलावाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार न केल्याच्या निषेधार्थ आशुतोष काळे यांनी सोमवार पासून सुरु केलेल्या धरणे आंदोलानाच्या सहाव्या दिवशी प्रशासनाने लक्ष घालावे अन्यथा या आंदोलनाला वेगळ स्वरूप प्राप्त होऊ नये यासाठी कोपरगाव शहरातील विविध संघटनांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन दिले. कोपरगाव शहराचा भीषण झालेल्या पाणी प्रश्नाचे गांभीर्य घेतल्यामुळेच या धरणे आंदोलनाला दिनांक ३१/५/२०१९ रोजी कोपरगावच्या समस्त नागरिकांनी पाठींबा देत संपूर्ण कोपरगाव शहर बंद ठेवले होते. त्यामुळे सुरु असलेले धरणे आंदोलनाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोपरगाव शहराला भेडसावत असलेली पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी साठवण तलाव क्रमांक ४ व ५ चे काम तातडीने करावे यासाठी सुरु असलेल्या आशुतोष काळे यांच्या सुरु असलेल्या धरणे आंदोलानाला वेगळे वळण लागू नये यासाठी या आंदोलनाची प्रशासनाने तातडीने दखल घेवून गायत्री कंस्ट्रक्शन कंपनीला ५ नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरु करण्यासाठी व कोपरगाव नगरपरिषदेला तातडीने साठवण तलाव क्रमांक ४ व ५ चे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी व्यक्तिश: लक्ष घालून सूचना कराव्या अशी मागणी दिलेल्या निवेदनात या विविध संघटनांनी केली आहे. कोपरगाव शहरातील प्रतिष्टीत नागरिक व नगरसेवकांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांची भेट घेवून तातडीने तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी केली.त्यावर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आशुतोष काळे यांचे सुरु असलेल्या धरणे आंदोलनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून यावर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram