आशुतोष काळेंच्या धरणे आंदोलनाला सर्व धर्मांच्या धर्मगुरुंचे आशीर्वाद

मागील सहा दिवसांपासून आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी सुरु केलेले धरणे आंदोलन सातव्या दिवशी (दि.२) रोजीही अखंडपणे सुरूच होते. या धरणे आंदोलनाला कोपरगाव शहरातील नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात पाठींबा दिला असून आंदोलनच्या सातव्या दिवशी रविवार दिनांक २/६/२०१९ रोजी विविध धर्माच्या धर्मगुरूंनी धरणे आंदोलन स्थळी आशुतोष काळे यांची भेट घेवून त्यांना आशीर्वाद दिले. कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावांची साठवण क्षमता कमी आहे. त्यासाठी चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरण व नवीन पाच नंबर साठवण तलावाचे काम कोपरगाव नगरपरिषदेणे तातडीने सुरु करून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागावा यासाठी आशुतोष काळे यांनी आजवर विविध आंदोलन केली असून आमरण उपोषण देखील केले आहे. परंतु कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाचे सोयरसुतक नसलेल्या सत्ताधा-यांकडून आज पर्यंत या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाला सोयीस्कररित्या बगल देण्यात आली आहे. साठवण तलाव क्रमांक पाच चे काम करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या बैठकीत गायत्री प्रोजेक्ट्स कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर ताताराव डुंगा यांनी सहमती दर्शविली होती परंतु राजकीय दबावाखाली आलेल्या या गायत्री प्रोजेक्ट्स कंपनीणे आजपर्यंत पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु केले नाही. तसेच कोपरगाव नगरपरिषदेणेही चार नंबर व पाच नंबर साठवण तलावाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार न केल्याच्या निषेधार्थ आशुतोष काळे मागील सात दिवसांपासून धरणे आंदोलनाला बसलेले आहेत. धरणे आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान सण दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. या धरणे आंदोलनाला वेगळे स्वरूप प्राप्त होऊ नये व कोपरगाव शहराचा सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अशी सामाजिक संघटनांनी कोपरगाव तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे.आंदोलनच्या सातव्या दिवशी विविध धर्माच्या धर्मगुरूंनी धरणे आंदोलन स्थळी भेट दिली. आशुतोष काळे करीत असलेल्या पुण्याच्या कामाचे तोंडभरून कौतुक करून तुमच्या निस्वार्थी पुण्याच्या लढ्याला परमेश्वर निश्चितपणे यश येईल असे आशीर्वाद दिले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram