५ नंबर साठवण तलावाचे काम करण्यास गायत्री कन्स्ट्रक्शन तयार समृद्धी महामार्गाचे काम बंद करण्याचे आंदोलन स्थगित – आशुतोष काळे

कोपरगाव शहरातील नागरिकांची पाणी टंचाई पासून कायमची सुटका व्हावी यासाठी आशुतोष काळे यांनी मागील आठ दिवसापासून गायत्री कंस्ट्रक्शन कंपनीने ५ नंबर साठवण तलावाचे काम करावे व कोपरगाव नगरपरिषदेणेही तातडीने ४ नंबर व ५ नंबर साठवण तलावाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करावे या प्रमुख मागणीसाठी सोमवार दिनांक २७/५/२०१९ पासून धरणे आंदोलन सुरु केले होते. कोणताही ठोस तोडगा निघत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा आशुतोष काळे यांनी घेतल्यामुळे मागील सात दिवसात या धरण आंदोलनाची व्याप्ती दिवसागणिक वाढत गेली. या धरणे आंदोलनाच्या आठव्या दिवशी काल (दि.३) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व गायत्री कन्स्ट्रक्शनचे उपाध्यक्ष रेड्डी यांच्या समवेत बैठक पार सायंकाळी उशिरा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गायत्री कन्स्ट्रक्शनचे उपाध्यक्ष रेड्डी यांनी पाच नंबर साठवण तलावाचे काम करण्यास तयार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना सांगितले असल्याची आशुतोष काळे यांनी माहिती दिली आहे. कोपरगाव नगरपरिषदेने या पाच नंबर साठवण तलावाचे काम करण्यासाठी साठवण तलावाचा आराखडा करून द्यावा असे पार पडलेल्या बैठकीत गायत्री कन्स्ट्रक्शनचे उपाध्यक्ष रेड्डी यांनी जिल्हाधिका-यांना सांगितले आहे. त्यामुळे (दि.४) रोजी प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार योगेश चंद्रे हे आंदोलन स्थळी येवून त्याबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचे आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचे काम बंद करणार असल्याचे आंदोलन स्थगित करीत असून धरणे आंदोलन मात्र सुरूच राहणार असल्याचे आशुतोष काळे यांनी न्ह्तले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram