रमजान महिन्यातील उपवासाने आत्म्याचे, आचारविचारांचे शुद्धीकरण – मा.आ. अशोकराव काळे

रमजान महिन्याचे माहात्म्य व पावित्र्य खूप मोठे आहे. इस्लाम धर्मात रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण रमजान महिन्यात मुस्लीम बंधू-भगिनी अतिशय कडक उपवास करतात. या उपवासामुळे आत्म्याचे व आचारविचारांचे शुद्धीकरण होते असे प्रतिपादन माजी आमदार अशोकराव काळे यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हाताने रोजदारांनी घास घेवून उपवास सोडले. ते पुढे म्हणाले की, पवित्र असणाऱ्या रमजान महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर सर्व मुस्लीम बंधू भगिनींनी तसेच लहान मुलांनी देखील अतिशय कठोर उपवास केले. यावर्षी उन्हाचा पारा अतिशय वाढलेला असतांना आपण केलेले उपवास किती कठीण होते याची कल्पना येत असल्याचे सांगितले. संपूर्ण महिनाभर अत्यंत कडकडीत रोजे, पाच वेळेचा नियमित नमाज, कुराण पठण, अल्लाहचे चिंतन केले त्या अल्लाहने तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्या. कोपरगाव च्या जनतेने मला १० वर्ष सेवा करण्याची संधी दिली. ते ऋण फेडण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्नही केले. कोपरगाव शहराची पाणी टंचाई कमी व्हावी यासाठी मी ४ नंबर साठवण तलावासाठी दोन कोटी रुपयांचा निधी आणला होता. परंतु दुर्दैवाने ४ नंबर साठवण तलावाचे काम न होताच हा निधी परत गेला याचे दु:ख होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोपरगाव तालुक्याचा दुष्काळ मिटावा व यावर्षी भरपूर पाऊस पडून शेतकरी सुखी व्हावा अशी प्रार्थना करून सर्व मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या अशोकराव काळे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी हाफिज महम्मद खान, मौलाना यासिन मिल्ली, मौलाना निसार अहमद, मौलाना हाफिज बशिर, मौलाना फजलु रेहमान, नगरसेवक संदीप पगारे, अजीज शेख, फकीरमामू कुरेशी,नवाज कुरेशी, हाजी हारूण, ईस्माईल शेख, हाजी मेहमूद, मेहमूदखा बागवान, जावेद शेख, चांदभाई पठाण, फिरोज पठाण, रसिद सय्यद आदी मान्यवरांसह मुस्लीम बांधव व विविध जातीधर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram