आशुतोष काळेंनी दिल्या मुस्लीम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा

रमजाण चा महिना मुस्लीम बांधवांसाठी अतिशय पवित्र महिना असतो. या पवित्र महिन्यात मुस्लीम बंधू भगिनी अतिशय खडतर उपवास व पवित्र कुराण ग्रंथ पठन करून अल्लाहची उपासना करतात. रमजान महिन्यातील उपासनेला मुस्लीम समाजबांधव अतिशय महत्त्व देत असून रमजान महिन्याची सांगता होत असतांना येणारा रमजान ईद चा सण आपुलकीचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाची उधळन करणारा आहे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव येथील ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ते बोलत होते. कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहामध्ये मुस्लीम बांधवांनी रमजान ईदचा सण साजरा केला. मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठन केले. याप्रसंगी आशुतोष काळे यांनी सर्व मुस्लीम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विजयराव आढाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार,राजेंद्र वाकचौरे, हिरामण गंगूले,फकिरमामु कुरेशी, नवाज कुरेशी, अजीज शेख, मेहमूद सय्यद, बाळासाहेब रुईकर, रमेश गवळी, राहुल देवळालीकर, सचिन परदेशी, अॅड. मनोज कडू, इम्तियाज अत्तार, हारुन शेख, वहाबभाई कुरेशी, रहेमान कुरेशी, फिरोज पठाण, अंबादास वडांगळे, धनंजय कहार, जनार्दन शिंदे, नारायण लांडगे, दिनकर खरे,रसीद शेख, ईस्त्राइल शेख, चांदभाई पठाण, नितीन साबळे, राजेंद्र आभाळे, वाल्मिक लहिरे, रावसाहेब साठे, बाला गंगूले, बापू वढणे, पिनू सावतडकर तसेच मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram