कर्मवीर काळे कारखान्याकडून शेततळे व ठिबक अनुदानापोटी २ कोटी ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा – आशुतोष काळे

सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यातील गळीत हंगाम २०१८-१९ च्या गळीतास आलेल्या ऊसाला शेततळे व ठिबक अनुदानापोटी प्रति मेट्रिक टन रु. १०० प्रमाणे २ कोटी ७ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी दिली आहे. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांना शेतकऱ्यांविषयी असलेल्या तळमळीची जाणीव ठेवून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची धुरा अतिशय उत्तमपणे सांभाळत आहे. २०१८-१९ च्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी गाळपास येणाऱ्या ऊसाला प्र.मे..टन.२३००/- रुपयांची पहिली उचल देणार असे जाहीर करून यावरच थांबणार नाही असा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवत २०१८/१९ च्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला सरसकट एकरक्कमी वीना कपात २५००/- रुपयाचा दर दिला आहे. २०१८-१९ च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाची देय रक्कम कारखान्याने नियमाप्रमाणे त्या त्या वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली असून चालू गळीत हंगामात प्रती मे. टन रुपये १००/- प्रमाणे २ कोटी सात लाख रुपयांचे शेततळे व ठिबक अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे. यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अतिशय भयावह असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देत शेततळे व ठिबक अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये अतिशय समाधानाचे वातावरण पसरले आहे. आज दुष्काळाच्या दृष्टचक्रात सहकारी साखर कारखानदारी अडकलेली आहे. साखर उद्योगापुढे अनेक आव्हाने असतांनाही नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवणारे माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचा वारसा आशुतोष काळे समर्थपणे पुढे चालवीत आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram