ध्येय गाठण्यासाठी जिद्दीने लढा – आशुतोष काळे

आयुष्यात ज्यांच्याजवळ उमेद असते ते जीवनात नेहमीच यशस्वी होतात. तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्राचीच निवड करून मनातील ध्येय गाठण्यासाठी जिद्दीने लढा. तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल असा महत्वपूर्ण संदेश कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी दिला. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे वतीने एच. एस. सी. व एस. एस. सी. परीक्षा २०१९ मध्ये विशेष नैपुण्य मिळविलेल्या कोपरगाव, राहाता तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी “झी मराठी” वाहिनीवरील “लागीर झालं जी” मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर अर्थात शीतल प्रमुख अतिथी म्हणून हजर होत्या. यावेळी पुढे बोलतांना आशुतोष काळे म्हणाले की,माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी शेतकरी, कष्टकरी व गोर गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी अहमदनगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यात रयत शिक्षण संस्थेचे जाळे विणले त्यामुळे हजारो विद्यार्थी शिक्षण घेवू शकले.कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांना शिक्षणक्षेत्राविषयी विशेष आपुलकी होती.त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच दरवर्षी १० वी १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाच्या वतीने दरवर्षी सत्कार सोहळा केला जात असल्याचे सांगितले. जे यश आज तुम्ही मिळविले आहे भविष्यात यापेक्षाही मोठे यश मिळवून आपल्या देशाचे व आपल्या कुटुंबाचे नाव निश्चितपणे मोठे कराल याचा मला विश्वास आहे.तुम्ही या देशाचे जबाबदार नागरिक आहात.त्यामुळे वाईट विचार व वाईट गोष्टीपासून दूर राहण्याचा सल्ला उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी दिला. चौकट –ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा गौरव करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी चालविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. यावरून काळे परिवाराला शिक्षण क्षेत्र किती जिव्हाळ्याचे आहे याची प्रचीती येत असून त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात नवी उमेद, नवी भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखाना बळ मिळणार आहे – शीतल अर्थात शिवानी बावकर यावेळी दिग्विजय यादव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, कारभारी आगवन, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम,बाळासाहेब बारहाते, आनंदराव चव्हाण, अशोकमामा काळे, पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसयाताई होन, उपसभापती अनिल कदम, सदस्य अर्जुनराव काळे, मधुकर टेके, श्रावण आसने, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली साबळे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक अध्यक्ष चारुदत्त सिनगर, नगरसेवक विरेन बोरावके, सौ. प्रतिभाताई शिलेदार, सौ. वर्षा कहार, सौ.माधवी वाकचौरे, अजीज शेख, नवाज कुरेशी, कृष्णा आढाव, राहुल देवळालीकर, अड. शंतनू धोर्डे, स्वप्नील पवार, डॉ. तुषार गलांडे, संदीप कपिले आदी मान्यवरांसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक कारभारी आगवन यांनी केले. यावेळी अड. शंतनू धोर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व शिक्षक हजर होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram