गौतम पब्लिकमध्ये जिल्हयातील पहिले युरोकिड्स प्रीप्रायमरी स्कूल सुरु – सौ. चैतालीताई काळे.

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कुलमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या युरो किड्स या प्रीप्रायमरी शाखेचे उदघाटन आज युवानेते आशुतोषदादा काळे, संस्थेचे उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या उपस्थितीत पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त भास्करराव आवारे होते. यावेळी युवानेते आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते युरो किड्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.युरो किड्सच्या जगभरात अनेक शाखा असून विद्यार्थ्यांना जगप्रसिद्ध हॉवर्ड विद्यापीठातुन प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम येथे शिकवला जाणार आहे.लहान मुलांचा संपूर्ण विकास व्हावा यासाठी त्यांचे निरागस मन लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम बनवण्यात आलेला असून लहान मुलांचा बौद्धिक व शारीरिक विकास करून त्यांच्या भविष्याची पायाभरणी करणे हे युरो किड्सचे लक्ष आहे. योग, संगीत व शारीरिक क्षमता यांचा योग्य समन्वय साधून युरोकिड्स मध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जाते. तसेच अहमदनगर जिल्ह्यात गौतम पब्लिक स्कुलमध्ये युरो किड्सची पहिली शाखा सुरू केल्याचा आनंद होत असल्याचे यावेळी सौ. चैतालीताई काळे यांनी सांगितले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्षा छबुराव आव्हाड, विश्वस्त कारभारी जाधव, सिकंदर पटेल, भास्करराव आवारे,बाळासाहेब बारहाते, सदस्य दिलीप चांदगुडे, प्राचार्य नुर शेख, युरो विभाग प्रमुख सौ.विमल राठी, प्राचार्या विजया गुरसळ, प्राचार्य सुभाष भारती, मुख्याध्यापक प्रकाश गुडघे, बाळासाहेब गुडघे,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, युरो किड्समध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram