ब्राम्हणगाव, धारणगाव, कोपरगाव शहराच्या खडकी भागात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत द्या – आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव, धारणगाव व कोपरगाव शहराच्या खडकी भागात शनिवार (दि.२२) रोजी झालेल्या अतिवृष्टीने नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे तहसीलदारांनी तातडीने पंचनामे करून मदत मिळवून द्यावी तसेच खडकी भागात कोपरगाव नगरपरिषद व ब्राह्मणगाव, धारणगाव येथे पंचायत समितीने नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी या ठिकाणी तातडीने जंतुनाशक फवारनी करावी अशा सुचना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिल्या आहेत. शनिवार दिनांक २२/६/२०१९ रोजी रात्री १० वाजता सुरु झालेल्या मुसळधार पावसाने सलग अडीच ते तीन तास विजेच्या प्रचंड कडकडाटासह कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव, धारणगाव व कोपरगाव शहराच्या खडकी भागात जोरदार हजेरी लावून संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढत नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका ब्राम्हणगावला बसला असून ८० टक्के नागरिकांना या अतिवृष्टीचा फटका बसला असून जीवित्तहाणी टळली असली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे. या अतिवृष्टीच्या तडाख्यामध्ये ३० शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून एक गाय दगावली आहे तर शेकडो कोंबड्या वाहून गेल्या आहेत. आदिवासी कुटुंबाच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्य तसेच अनेक विद्यार्थ्याचे महत्वाचे शासकीय कागदपत्र व शालेय साहित्य पाण्यात वाहून गेले. दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानदारांचा माल भिजला आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळीमध्ये पाणी शिरल्यामुळे शेकडो क्विंटल कांदा भिजला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी टाकळी रोडला कांदा साठवणुकीसाठी काही शेड उभारले होते या शेडमध्येही पावसाचे पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. धारणगावमध्येही या अतिवृष्टीमुळे म्हसोबानगरचा परिसर पूर्णपणे पाण्यात गेला असून शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागा व चारा पिकांना पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. या पावसाचा फटका कोपरगाव शहरातील खडकी भागातील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. सदरच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या घटनेची माहिती समजताच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी सकाळीच ब्राम्हणगाव, धारणगाव व खडकी येथे जावून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नागरिकांचे झालेले प्रचंड नुकसान पाहून त्यांनी प्रत्येक कुटुंबाची समक्ष भेट घेवून त्यांना धीर देत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे वतीने तातडीची मदत केली. झालेल्या निसर्गनिर्मित संकटाणे घाबरून जावू नका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व मी तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे खचून जाऊ नका अशा शब्दांत त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना आधार दिला. सकाळपासून आशुतोष काळे घटनास्थळी ठाण मांडून बसले होते. तहसीलदार योगेश चंद्रे, कृषी अधिकारी आढाव व पशुवैद्यकीय अधिकारी दहे हेही त्यावेळी आशुतोष काळे यांच्या सोबत घटनास्थळी होते. झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानगस्त नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरात रोगराईचे साम्राज्य पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते त्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने व पंचायत समितीने तातडीने जंतूनाशक फवारणी करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन साहेबलाल शेख, धारणगावचे सरपंच नानासाहेब चौधरी, तुकाराम उळेकर, रविंद्र पिंपरकर, गोटू जगताप, केशव कुऱ्हाडे, शिवनाथ कुऱ्हाडे, सोनवणे व आहेर कुटुंब,राजेंद्र जाधव तसेच नगरसेवक मंदार पहाडे, सुनील शिलेदार राजेंद्र वाकचौरे, हिरामण कहार, अजीज शेख व कार्यकर्त्यांनी नागरिकांना सहकार्य केले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram