गरजू नागरिकांपर्यंत घरकुलाचा लाभ पोहोचवा -सभापती अनुसया होन

कोपरगाव तालुक्याला २०१९-२० या वर्षासाठी तब्बल २१४८ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले असून तालुक्यातील ग्रामपंचायतींनी हक्काच्या घरापसुन वंचित असणाऱ्या गरजू नागरिकांपर्यंत घरकुलाचा लाभ पोहोचवावा असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसयाताई होन यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे. प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हक्काच्या घरापसुन वंचित असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना आपल्या हक्काचे घरकुल मिळावे यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत आहे. कोपरगाव तालुक्याला रमाई आवास योजने अंतर्गत ५५०, शबरी आवास योजना ५०, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून एस. सी. वर्गासाठी २३२, एस. टी. वर्गासाठी ८९५, इतर घटकांसाठी ३६१, अपंग ६० असे एकूण २१४८ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याच बरोबर दलित वस्ती सुधार योजनेसाठी ४० टक्के निधी रुपये २ कोटी १० लाख रुपये उपलब्ध झाला आहे. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार गरजवंत नागरिकांना या घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायतींनी आपापल्या गावातील गरजू नागरिकांचे घरकुलाचे प्रस्ताव तातडीने तयार करून पंचायत समितीकडे पाठवावे. तसेच दलित वस्ती सुधार योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला असल्यामुळे दलित वस्ती सुधार योजनेच्या कामाला गती मिळणार असून यापुढेही आपण कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी आमचे नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील राहणार असल्याचे सभापती सौ. अनुसयाताई होन यांनी शेवटी म्हटले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram