वै.प.पु. तुकारामबाबांच्या पालखीचे मा. आ. अशोकराव काळेंनी केले पूजन

तमाम वारक-यांचे श्रद्धास्थान असलेल्या व महाराष्ट्राची प्रतीपंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या श्री. क्षेत्र खेडलेझुंगे ता. निफाड येथून सालाबादप्रमाणे याहीवर्षी ह.भ.प. गुरुवर्य रघुनाथ महाराज खटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. तीर्थक्षेत्र खेडलेझुंगे ते श्री. क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार दिनांक २४/६/२०१९ रोजी श्री. तीर्थक्षेत्र खेडलेझुंगे येथून वै.प.पु. तुकारामबाबांच्या पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात श्री. क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मनात विठुरायाच्या दर्शनाची आस घेवून निघालेल्या शेकडो वारक-यांच्या सोबतीने हा पायी दिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दिंडीचे आगमन झाले. त्यावेळी कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार अशोकराव काळे यांनी वारक-यांचे स्वागत करून वै.प.पु. तुकारामबाबा खेडलेकर महाराजांच्या रथाचे व पालखीचे विधिवत पूजन करून ह.भ.प. गुरुवर्य रघुनाथ महाराज खटाणे यांचा सत्कार केला. वारीतील वारकऱ्यांना त्यांनी शुभेच्छा देवून पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी दिंडीतील वारकर्‍यांना रेनकोट दिले. याप्रसंगी शिवभक्त गोवर्धनगिरिजी महाराज, कारखान्याचे संचालक मीननाथ बारगळ, राजेंद्र मेहेरखांब, गौतम बँकेचे संचालक राजेंद्र ढोमसे, गौतम केनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ज्ञानेश्वर हाळनोर, भास्करराव मांजरे, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष इंद्रभान ढोमसे, सुरेगावच्या माजी सरपंच सौ.सुमनताई कोळपे, उपसरपंच सुनील कोळपे, सर्व सदस्य, अंबादास धनगर, तसेच शहाजापुरचे उपसरपंच बाळासाहेब ढोमसे, भगवान विष्णू मंदिर कमिटीचे अध्यक्ष पोपट जाधव, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उद्योग समुहाचे पदाधिकारी व भजनी मंडळाचे सदस्य व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी ह.भ.प. देवराम महाराज बारगळ यांच्या सुश्राव्य कीर्तनात वारकरी व भावीक भक्ती रसात न्हावून गेले होते. मृदुंग साथ ह.भ.प. विनायक महाराज वाघ यांनी केली.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram