कर्मवीर काळे कारखाना व उद्योगसमूहाशी स्नेह व ऋणानुबंध असेच ठेवा – मा. आ.अशोकराव काळे

आयुष्याची ३० ते ३५ वर्ष सेवा करीत असतांना निवृत्तीच्या वेळी मनाला वाईट वाटणारच परंतु शासनाच्या नियमानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला विशिष्ट वयानंतर निवृत्त व्हावेच लागते. नोकरीत असतांना एका चाकोरीत राहून जीवन जगावे लागते. त्यामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांनी खचून न जाता स्वत:ला गुंतवून घ्या. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच कामगारांचे हित जोपासले असून आशुतोषही काळे साहेबांचा वसा पुढे चालवीत आहे. तुम्ही निवृत्तिनंतरही समाजाची सेवा करू शकता याचा मला पूर्ण विश्वास असून कर्मवीर काळे कारखाना व उद्योगसमूहाशी आपला स्नेह व ऋणानुबंध असाच ठेवा असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व आसवनी विभागातील एकूण ५० कर्मचा-यांचा सेवा निवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी साखर कारखाना ३२ व आसवनी विभागातील १८ अशा एकूण ५० कामगारांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना चेअरमन युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की, २०१६ साली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक निसर्गनिर्मित व राजकीय संकट आली परंतु सर्व संकटात सभासद, कर्मचारी व सर्वच घटकांनी अतिशय मोलाची साथ दिल्यामुळे हि सर्व संकटे यशस्वीरीत्या परतावून लावली परंतु या संकटांची सावली कधीच कामगारांच्या सुखावर पडू दिली नाही. आपण प्रामणिकपणे आपली जबाबदारी पार पाडून निवृत्त होत आहात त्यामुळे मनाने कधीच निवृत्त होऊ नका. नोकरीत असतांना नातेवाईकांच्या सुख-दु:खात सहभागी होता आले नसेल तर यापुढे नातेवाईकांच्या सुख-दु:खात सहभागी होऊ नात्यांना उजाळा द्या. नोकरीत असतांना आपल्याला कोणत्याच गोष्टीची उणीव भासू न देता आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी यापुढे त्यांची काळजी घ्यावी असे आवाहन निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना केले. आपण सर्व काळे परिवाराचे सदस्य होता व यापुढेही राहणार अशी ग्वाही त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिली. याप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील शिंदे, सर्व संचालक मंडळ यांचेसह कारखान्याचे कार्यकारी संचालक संचालक गिरीश जगताप, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जे. ए. भिडे, सेक्रेटरी एस. एस. कोल्हे, ऑफिस सुपरिटेडेट बी. बी. सय्यद, वर्क्स मॅनेजर डी. बी. चव्हाण, चिफ इंजिनियर एन. बी.गांगुर्डे, शेतकी अधिकारी के.व्ही. कापसे, चिफ केमिस्ट एस. जे. ताकवणे, चीफ अकौटंट एस. एस. बोरनारे, तसेच विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी यांचेसह माजी कामगार मोठ्या संख्येने आपल्या परिवारासह उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत सेक्रेटरी सुनिल कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर आभार व्हा. चेअरमन सुनील शिंदे यांनी मानले. यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परीवाराने आपले मनोगत व्यक्त करतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्वागत सेक्रेटरी एस. एस. कोल्हे यांनी केले. सूत्रसंचलन संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर आभार व्हा. चेअरमन सुनील शिंदे यांनी मानले. यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram