कर्तव्य समजून पर्यावरणाचे रक्षण करावे – चैतालीताई काळे

बेसूमार होत असलेल्या वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित पर्जन्यमान, अतीउष्णता अशा संकटांना सामोरे जावे लागत आहे. याकडे आजच गांभीर्याने पाहिले नाही तर पुढच्या पिढीला याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे ही आपली फक्त जबाबदारी नाही तर आपले कर्तव्य समजून पर्यावरणाचे रक्षण करावे असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुका जिंनिंग प्रेसिंग सोसायटीच्या परिसर व कोपरगाव शहरातील श्रद्धा नगरी परिसरात सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, आज पर्यावरणाची हानी होत असल्याने दुष्काळासारखी संकटे उभी राहात आहे. निसर्गाच्या बिघडलेला समतोल सावरून त्यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. निसर्गचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल तर झाडे लावण्याबरोबर झाडे जगवली तरच आपण पर्यावरणरक्षण करू शकणार आहे याची जाणीव ठेवून आपल्यासाठी व आपल्या पुढील पिढीसाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी कर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. कर्मवीर प्रतिष्ठानचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून त्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी जिंनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, संचालक सुदाम लोंढे, सचिन आव्हाड, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, चारुदत्त सिनगर, महेश लोंढे, जनरल मॅनजर सुरेश काशिद, कर्मवीर प्रतिष्ठानचे डॉ. चंद्रशेखर आव्हाड, राजेंद्र आभाळे, मुकुंद इंगळे, राजेंद्र बोरावके, प्रदीप कुऱ्हाडे, नगरसेवक विरेन बोरावके, नगरसेविका सौ.माधवीताई वाकचौरे, राजेंद्र वाघचौरे, अंबादास वडांगळे, संतोष शेलार, शुभम लासुरे, सौ. रुपाली भोकरे, बेबीआप्पा पठाण, ज्योती पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram