पिक विमा योजनेत मका पिकाचा सामावेश करा – आशुतोष काळे

नैसर्गिक किंवा कुत्रिम संकटामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या विमा कंपनी मार्फत पंतप्रधान पिक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये सोयाबीन, बाजरी, कपाशी,कांदा, तूर आदी पिकांचा विमा काढण्यात येतो. या पिकांचे नुकसान झाल्यास सरकारी नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत असते. परंतु कोपरगाव तालुक्यात शासनाच्या या पिक विमा योजनेत मका पिकाचा सामावेश नसल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून शेतकरी वर्गात प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे. यावर्षी मका पिकावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे त्यामुळे पंतप्रधान पिक विमा योजनेत मका पिकाचा सामावेश करून मका पिकाला पिक विम्याचे संरक्षण मिळावे अशी मागणी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, मागील वर्षीच्या दुष्काळातून अद्याप शेतकरी सावरला नसतांना यावर्षी पडलेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन, बाजरी, कपाशी, मका आदी पिकांची पेरणी केलेली आहे. यावर्षी कोपरगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक नाही. विहिरींना पाणी नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत तरीसुद्धा पेरणीचा हंगाम वाया जावू नये म्हणून पाऊस पडेल या आशेवर आपल्या शेतात पेरणी केलेली आहे. जरी निसर्गनिर्मित दुष्काळाच्या संकटामुळे पिकाचे नुकसान झाले तर सोयाबीन, बाजरी, कपाशी या पिकांचा पिक विमा काढल्यास काही तरी नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. परंतु यावर्षी मका पिकावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्यामुळे मका पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटणार असून मका उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. अशी परिस्थिती असतांना इतर पिकांचा विमा स्वीकारण्यात येतो मात्र मका पिकाचा विमा स्वीकारण्यात येत नाही. कोपरगाव तालुक्यात मागील वर्षी मका पिकाचे क्षेत्र हे कमी होते परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात मका क्षेत्र वाढले आहे. परंतु मका क्षेत्र वाढल्याबरोबरच या मका पिकावर लष्करी अळीने हल्ला करून मका उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील वर्षी कोपरगाव तालुक्याच्या शेजारील तालुक्यांचा दुष्काळी यादीत सामावेश झाला असतांना संपूर्ण कोपरगाव तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असूनही कोपरगाव तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला गेला. त्यावेळी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे.एकीकडे मका पिकावर लष्करी अळींचा हल्ला तर दुसरीकडे मका पिकाला विमा कवच मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या भविष्यात होणाऱ्या नुकसानीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा योजनेत मका पिकाचा समावेश करावा अशी मागणी आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram