सर्व प्रकारच्या स्पर्धांसाठी गौतम पब्लिक स्कूलचे प्रशस्त क्रीडांगण अनुकूल -जिल्हा क्रिडाधिकारी सौ.कविता नावंदे-निबांळकर

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील जिल्हास्तरीय विभागीय तसेच राज्यस्तरीय नेहरू हॉकी व सुब्रतो फुटबॉल स्पर्धा होणार आहेत अशी माहिती अहमदनगर जिल्हा क्रिडा अधिकारी सौ.कविता नावंदे-निबांळकर यांनी दिली असून जिल्ह्यात गौतम पब्लिक स्कूलचे प्रशस्त क्रीडांगण सर्व प्रकारच्या स्पर्धांसाठी अतिशय अनुकूल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यस्तरीय नेहरू हॉकी व सुब्रतो फुटबॉल स्पर्धेसाठी गौतम पब्लिक स्कूलचा परिसर व क्रीडांगणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी सौ.कविता नावंदे-निबांळकर आल्या होत्या. या प्रसंगी त्या बोलत होत्या. त्याकामी त्यांनी शाळेला भेट देवुन क्रिडांगणांचा व तयारीचा आढावा घेतला.शाळेचे भव्य क्रीडांगण व निसर्गरम्य परिसर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर विविध प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यावेळी संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांनी स्पर्धा घेण्यासाठी आवश्यक असलेले सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते सौ. नावंदे-निबांळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बॅडमिंटन प्रशिक्षक विशाल गर्जे, प्राचार्य नूर शेख, फिजीकल डायरेक्टर सुधाकर निलक, हॉकी प्रिशक्षक रमेश पटारे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना जिल्हा क्रिडा अधिकारी सौ.नावंदे म्हणाल्या की, गौतम पब्लिक स्कूल ही निवासी शाळा आहे. शाळेचा परिसर हा शैक्षणिक व क्रिडाक्षेत्राच्या दृष्टीकोनातून उत्तम असून सर्व स्पर्धा यशस्वी पार पडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थी संख्या, शिस्त, शाळेचा परीसर क्रिडांगणे जेवणाची व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट असुन त्यांनी याबद्दल प्राचार्य नूर शेख व सर्व मॅनेजमेंटचे विशेष कौतुक केले. राज्यस्तरीय नेहरू हॉकी व सुब्रतो फुटबॉल स्पर्धांचे आयोजन गौतम पब्लिक स्कूलमध्ये करून शासनाला सहकार्य करत असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकरावजी काळे, विश्वस्त आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे तसेच संस्थेच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.शनिवार दिनांक २०/७/२०१९ पासून गौतम पब्लिक स्कूल मध्ये जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धा सुरु होणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram