संधी द्या वकील संघाचे प्रश्न मार्गी लावतो -आशुतोष काळे

कोपरगावमध्ये असलेल्या ब्रिटीशकालीन शासकीय इमारतींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या इमारती मोडकळीस आल्या होत्या. ज्यावेळी कोपरगाव तालुक्याच्या जनतेने माजी आमदार अशोकराव काळे यांना २००४ साली निवडून दिले त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम या शासकीय इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज कोपरगाव शहरात शासकीय इमारतींचे काम पूर्ण झाले असून या इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांना काम करणे सोयीचे झाले. आजही वकील बांधवाच्या अडचणी पूर्णपणे सुटल्या नसून मला संधी द्या वकील संघाचे प्रश्न मार्गी लावतो असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तालुका वकील महासंघाचा नूतन पदाधिकारी निवड समारंभ कार्यक्रम श्री. साईबाबा तपोभूमी मंदिर कोपरगाव येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सत्र न्यायाधीश एन. एन. मंगले होते. यावेळी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मोडकळीस आलेल्या न्यायालयाच्या इमारती, बारकौन्सिल इमारतबाबत प्रस्ताव पाठवूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगत वकील संघाच्या अडचणी मांडल्या. ते पुढे म्हणाले की, वकील संघाच्या अडचणी रास्त आहेत परंतु २००४ पर्यंत कोपरगाव शहरात असलेल्या तहसील कार्यालय, न्यायालयाच्या इमारती, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती कार्यालय आदी शासकीय इमारतींच्या नूतनीकरणाचा प्रश्न प्रलंबित होता.त्याचबरोबर वकिलांच्या बारकौन्सिलचाही प्रश्न सुटलेला नव्हता.त्यावेळी माजी आमदार अशोकराव काळे यांनी शासकीय इमारतींचे नुतनीकरण करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळेच आज कोपरगाव शहरात भव्य अशा शासकीय इमारती उभ्या राहिल्या आहेत. अजूनही वकील संघाच्या अडचणी बाकी आहेत. त्या अडचणी माजी आमदार अशोकराव काळे यांच्याप्रमाणे या अडचणी आपण सोडवू अशी ग्वाही त्यांनी वकील संघाच्या सदस्यांना दिली. यावेळी त्यांनी वकील महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश एन. एन. मंगले, न्यायाधीश आर. डी. भागवत, वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमती एस. एन. सचदेव वकील संघाचे अध्यक्ष अॅड शिरीष लोहकणे, उपाध्यक्ष अॅड जी. जी. गुरसळ, महिला उपाध्यक्ष अॅड सौ. एस. एस. देशमुख, सेक्रेटरी अॅड एम. एस. खैरनार, सहसेक्रेटरी अॅड एस. एस. डेंगळे, खजिनदार अॅड एस.पी.मगर, अॅड व्ही.जी.सदाफळ, अॅड यु. एन. पाइक, कु.काजळे पी.एस., अॅड सतीश बोरुडे, अॅड एन. पी. गिरमे, खजीनदार सागर मगर तसेच वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram