मोठे आजार टाळण्यासाठी आरोग्य शिबिराचा लाभ घ्या – सौ. चैतालीताई काळे.

कोणत्याही मोठ्या आजाराचे मूळ हे लहान आजारातच असते. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे व नियमितपणे आरोग्याची तपासणी करून आजाराचे स्वरूप लहान असतानांच या आजारावर उपचार घेतले पाहिजे. त्यामुळे भविष्यात मोठ्या आजारांना सामोरे जावे लागत नाही. त्यासाठी मोठे आजार टाळण्यासाठी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले. देर्डे कोऱ्हाळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे जिल्हा परिषद अंतर्गत आयोजित सर्वरोग निदान आरोग्य शिबीराचे उदघाटन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील नागरिक आजारी पडल्यानंतर उपचार घेण्याचे टाळतात. त्यामुळे लहान आजार बळावत जावून त्याचा मोठा त्रास भविष्यात सहन करावा लागतो. त्यामुळे आजारी पडल्यानंतर प्राथमिक उपचार घेवून त्या आजाराचे निदान करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांना कामाचा व्याप असल्यामुळे महिलाही आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे महिलांचेही आजार मोठ्या प्रमाणात बळावले आहेत त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून आठवड्यातून एक दिवस नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी उपस्थित राहण्याच्या सुचना केल्या. शासनाच्या सामाजिक वनीकरण कन्या वनसमृद्धी योजनेअंतर्गत लहान मुलींना ५ फळझाडे व ५ सागाच्या वृक्षांची रोपे देण्यात आली. या मुली मोठ्या झाल्यानंतर या वृक्षांच्या माध्यमातुन त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार लागावा असा या योजनेचा उद्देश आहे. यावेळी तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली रोहमारे, मेडिकल ऑफिसर डॉ. बडदे, वनक्षेत्रपाल पूजा रक्ताटे, सरपंच योगीराज देशमुख, उपसरपंच सुनीता शिंदे, वि.वि.का.सह सो. चेअरमन काशीनाथ डुबे, डॉ. नरेंद्र देशमुख, कृष्णा शिलेदार, कैलास डूबे, दामोदर डूबे, बाळासाहेब शिंदे, ज्ञानदेव शिंदे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram