डेंग्यू सदृश्य आजाराबाबत काळजी घ्या आशुतोष काळेंच्या आरोग्य विभागाला सुचना

नागरी वसाहतीमध्ये पावसाचे पाणी साचून या पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ति होत आहे. कोपरगाव तालुक्यात आज पर्यंत पावसाचे प्रमाण अतिशय अल्प असून त्यामुळे तापमानही प्रचंड प्रमाणात वाढले आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे अनेक नागरिक डेंग्यू सदृश्य आजाराच्या विळख्यात सापडले असून रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने खबरदारीच्या आवश्यक त्या उपाय योजना तातडीने कराव्या अशा सुचना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते यांना दिल्या आहेत. कोपरगाव शहर तसेच तालुक्यातील बोलकी, धोत्रे, सोनारी आदी गावांमध्ये डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सरकारी दवाखाने व खाजगी दवाखान्यामध्ये अशा डेंग्यू सदृश्य रुग्णांची संख्या वाढली आहे. कमी झालेले पर्जन्यमान व वातावरणाच्या झालेल्या बदलाचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांबरोबरच डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य विभागाणे शहर व तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी नागरिकांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करावे. ज्या ठिकाणी जंतू नाशक फवारणी अत्यावश्यक आहे त्या ठिकाणी फवारणी करावी. नागरिकांनीही आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार दिलेल्या सूचनांचे पालन करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आशुतोष काळे यांनी नागरिकांना केले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram