आशुतोष काळे यांच्या वतीने कोपरगाव शहरात औषध फवारणी

कोपरगाव शहरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांचे आरोग्य आबाधित राहावे यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्याने चेअरमन आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव शहरात जंतू नाशक फवारणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी युवानेते आशुतोष काळे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी बोलतांना आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव शहरात काही ठिकाणी गटारी तुंबल्यामुळे यामध्ये डासांचे प्रमाण वाढून नागरिकांना मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांची लागण झाली आहे. कोपरगाव शहरातील सर्व दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची एक हजारच्या वर जावून पोहोचली आहे. यामध्ये डेंग्यू सदृश्य रुग्णांचा देखील सामावेश असून यामध्ये वाढ होऊ नये. पावसामुळे साचलेल्या पाण्यात डास वाढून कोपरगाव शहरात रोगराई पसरू नये व कोपरगाव शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आपण आजवर प्रयत्न केलेला आहे. डासांमुळे डेंग्यु, मलेरिया आदी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शहरातील सर्व प्रभागात डासप्रतिबंधक जंतू नाशक फवारणी फवारणी करण्यात येणार असल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram