कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी पद्माकांत कुदळे

सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणा-या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी जेष्ठ संचालक पद्माकांत शंकरराव कुदळे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी पद्माकांत शंकरराव कुदळे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. पद्माकांत कुदळे यांच्या नावाची सुचना संचालक विश्वासराव आहेर यांनी मांडली त्या सूचनेला संचालक ज्ञानदेव मांजरे यांनी अनुमोदन दिले. आपल्या निवडीबद्दल बोलतांना नवनिर्वाचित उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या सोबत काम करीत असतांना त्यांनी नेहमीच संचालक मंडळातील सदस्यांच्या सूचनांचा विचार करून सभासद, कामगार कारखान्याच्या सर्वच घटकांचे हीत जोपासले तोच वसा आणि वारसा चेअरमन युवा नेते आशुतोष काळे पुढे चालवीत आहे. २०१६ साली त्यांनी चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारून तीन वर्षात कारखाना तोटामुक्त करून दाखविला हि खूप गौरवास्पद व अभिमानास्पद बाब आहे. असे नेतृत्व तालुक्याला लाभल्यास तालुक्याचे सर्व प्रश्न मार्गी लागून तालुका विकासाच्या वाटेवर येण्यास वेळ लागणार नाही. मोठ्या विश्वासातून सभासद, कामगार व तालुक्यातील व्यापारी वर्गाची कामधेनु असलेल्या संस्थेची टाकलेली जबाबदारी खूप मोठी आहे. परंतु कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचे आदर्श विचार डोळ्यासमोर ठेऊन सर्वाना सोबत घेवून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाची प्रगती साधण्याचा मनस्वी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, सेक्रेटरी सुनील कोल्हे, ऑफिस सुपरिटेंडेंट बाबा सय्यद व पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक सह.संचालक बाजीराव शिंदे (अहमदनगर) व सहाय्यक म्हणून सूरम यांनी काम पाहिले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram