वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून आशुतोष काळे पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीला

नासिक धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीपात्रात सायंकाळी ४ वाजता जवळपास दोन लाख ६० हजार क्पायुसेसने पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेवून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी आपल्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून पूर ग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी गेले. कारखान्याच्या मार्फत आपत्कालीन यंत्रनेच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी तातडीने यंत्रणा पाठवून सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. नासिक धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. गोदावरी नदीवरील तालुक्यातील हिंगणी येथील कोल्हापूर टाईप बंधारा हा पाण्याखाली गेला आहे. मंजूर बंधारा फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सायंकाळी कोपरगाव शहरातील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज मौनगिरी पुलावरून पाणी वाहू लागले होते. हवामान खात्याने अजून दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला असून पाटबंधारे विभागाकडून रात्रीतून गोदावरी नदीपात्रामध्ये याहूनही जास्त पाण्याचा विसर्ग होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा ईशारा दिला असून परिस्थिती हाताबाहेर जावू नये व जीवितहानी टाळण्यासाठी आशुतोष काळे यांनी यंत्रणा उभी करून निंभारा मैदान, गजानन नगर व ज्या ठिकाणी पुराचे पाणी पोहोचून हानी होबू शकते अशा ठिकाणच्या नागरिकांना चार चाकी वाहनाने शाळा खोल्यांमध्ये सुरक्षिपणे हलविले. या नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आशुतोष काळे यांनी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून कार्यकर्त्यांना नागरिकांची मदत करण्याचे आवाहन केले. नागरिकांना मदतीसाठी संपर्क तातडीने साधता यावा यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपत्कालीन पथकाच्या सदस्यांचे फोन नंबर उपलब्ध दिले रात्री उशिरापर्यंत संपूर्ण पूर परिस्थितीवर आशुतोष काळे बारीक लक्ष ठेवून होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram