आशुतोष काळे यांच्या वतीने कोपरगाव शहरात जंतुनाशक औषध फवारणी

रविवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे संपूर्ण कोपरगाव शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.पुराचे पाणी ओसरल्याने विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले असून या महापुराच्या पाण्याने कोपरगाव शहरात वाहून आलेला कचरा आणि त्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधीमुळे साथीचे रोग पसरू शकतात त्यामुळे या साथीच्या आजारांचा कोपरगावच्या नागरिकांच्या आरोग्याला त्रास होऊ नये यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात महापुराच्या पाण्याने बाधित झालेल्या संपूर्ण परिसरात जंतुनाशक औषध फवारणी सुरु करण्यात आली आहे. कोपरगाव शहरात मागील काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांची लागण झाली आहे. त्यामध्ये आलेल्या महापुराच्या पाण्याची भर पडल्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया अशा विविध आजारांना नागरिक बळी पडू शकतात यामध्ये लहान मुलांना आणि जेष्ठ नागरिकांना यांचा जास्त त्रास होऊ शकतो हि शक्यता लक्षात घेवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू नये. यासाठी आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कोपरगाव शहरात जंतुनाशक औषध फवारणी प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी शहराध्यक्ष सुनील गंगुले,विजयराव आढाव, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे तसेच डॉ.तुषार गलांडे, नवाज कुरेशी, राजेंद्र बोरावके, राजेंद्र आभाळे, राजेंद्र खैरनार, जावेद शेख, रोहित खडांगळे, नितीन साबळे, आनंद जगताप, निखील डांगे,चंद्रशेखर म्हस्के, संतोष टोरपे,कार्तिक सरदार आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram