पंचायत समितीच्या माध्यमातून महिलांना मोटर ड्रायव्हिंग प्रशिक्षण व परवाना -सभापती अनुसयाताई होन

पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सभापती सौ.अनुसयाताई होन यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामीण भागातील महिलांना ४ चाकी मोटर चालविण्याचे प्रशिक्षण व ४ चाकी वाहन चालविण्याचा परवाना देण्याचा शुभारंभ कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे करण्यात आला.या वेळी बोलतांना सभापती सौ. अनुसयाताई होन म्हणाल्या की, महिला आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकरी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी नेहमीच महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आजवर प्रयत्न केले आहे. महिलांनी चूल आणि मुल ही कक्षा ओलांडून बाहेर पडले पाहिजे यासाठी त्यांनी महिलांना सतत प्रोत्साहन दिले आहे. तोच विचार डोळ्यासमोर ठेवून पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून महिलांना चार चाकी वाहनाचे प्रशिक्षण व वाहन चालविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या पुढेही महिलांसाठी अशा योजना अजून व्यापक स्वरूपात राबवून सर्व गरजूंना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी या योजनेसाठी निवड झालेल्या महिलांनी सभापती सौ.अनुसयाताई होन व जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनालीताई रोहमारे याचे आभार मानले.या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, राहुल रोहमारे, रोहिदास होन, शंकरराव चव्हाण, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, सरपंच योगीराज देशमुख, धनंजय चव्हाण, विलास चव्हाण, मतीन शेख, सचिन होन, दादासाहेब होन, अशोक होन, प्रभाकर होन, सतीश चव्हाण, प्रवीण होन, अरुन खरात, संजय लोढा, शिवाजी होन, मधुकर होन, किरण होन, कर्णा गुरसळ, दिगंबर गुरसळ, नामदेव माकोने, डॉ. सोपान होन, सुधाकर होन आदी मान्यवरांसह चांदेकसारे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram