निरोगी आरोग्यासाठी मैदानी खेळाला महत्त्व दिले पाहिजे – आशुतोष काळे

शारिरीक क्षमता व व्यक्तितील इतर महत्वाच्या गुणांचा विकास हा मैदानी खेळामुळे होत असतो. खेळाकडे मनोरंजन म्हणून न पाहता शारीरीक व्यायाम या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. मैदानी खेळामुळे इतर सुप्त गुण सुध्दा विकसित होत असून व्यक्तिमत्व विकासात शारीरीक क्षमता वाढविण्यासाठी मैदानी खेळ अतिशय महत्वाचे आहे. युवकांनी व्हाटसअॅप, फेसबुक वर वेळ वाया घालविण्यापेक्षा निरोगी आरोग्यासाठी मैदानी खेळाला महत्व दिले पाहिजे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे जय बजरंग तालीम संघ यांचे वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेचे उदघाटन युवानेते आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. दिवस रात्र ३ दिवस या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या कबड्डी स्पर्धांमध्ये कोपरगाव तसेच शेजारी तालुक्यातील संघांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये १५,०००/- , द्वितीय बक्षीस १०,०००/-, तृतीय बक्षीस ७,०००/- तर चतुर्थ बक्षीस रुपये ४,०००/- ठेवण्यात आले आहे. स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी कोळपेवाडीचे सरपंच व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक निवृत्ती कोळपे, ग्रामपंचायत सदस्य राजू नाना कोळपे, महेश कोळपे, माजी सरपंच जनार्दन कोळपे, दत्तात्रय धायगुडे, अनिल कोळपे तसेच जय बजरंग तालीम संघाचे खेळाडू सदस्य व कबड्डी शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram