यावर्षीचा गळीत हंगाम अतिशय आव्हानात्मक सर्वांच्या सहकार्याने गळीत हंगाम २०१९ यशस्वी करू – आशुतोष काळे

मागील वर्षी पर्जन्यमान अतिशय कमी राहिले त्यातच गोदावरी कालव्याचे आवर्तन रब्बी व उन्हाळी हंगामात अपुरे मिळाले. काही चाऱ्यांना तर अडीच किलोमीटरची बंधने घालून अपूर्ण आवर्तन दिले गेले. नगर-नाशिक धरणांमधून जलसंपत्ती अधिनियम २००५ च्या कायद्याचा आधार घेत जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले. कडक उन्हाळा, चारा पाण्याची भीषण टंचाई अशा परिस्थितीत उभा ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत ५० टक्क्याने साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. यावर्षीचा गळीत हंगाम अतिशय आव्हानात्मक असला तरी सर्वांच्या सहकार्याने गळीत हंगाम २०१९-२० यशस्वी करू असा विश्वास कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे जेष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, व्हा. चेअरमन पद्माकांत कुदळे, जेष्ठ नेते छबुराव आव्हाड, कारभारी आगवन, बाळासाहेब कदम, नारायण मांजरे, अॅड. आर. टी. भवर, अॅड. एस. डी. औताडे, संभाजीराव काळे, सर्व संचालक मंडळ, सर्व संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य,नगरपालिकेचे सदस्य, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, सेक्रेटरी सुनील कोल्हे, ऑफिस सुपरिटेंडेंट बाबा सय्यद, कारखान्याचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना आशुतोष काळे म्हणाले की, मागील वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात १०२ सहकारी व ९३ खाजगी असे ११५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. राज्यामध्ये ९५२.११ लाख मे.टन ऊसाचे गाळप होऊन १०७.२१ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा हा ११.२६ राहिला आहे. २०१८-१९ च्या १६४ दिवसांच्या गाळप हंगामात एकूण ६,३९,८१७ मे. टन ऊसाचे गाळप करून ६,९८,६७० क्विंटल साखर उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा १०.९२ राहिला असल्याचे सांगितले. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच शेतकरी हितास प्रथम प्राधान्य देण्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मागील हंगामात जिल्ह्यात सर्वप्रथम २,३००/- रुपये प्रथम हफ्ता देण्याचा निर्णय घेतला. त्यापुढे जावून साखरेच्या दराचा व इतर कारखान्यांच्या ऊस दराचा विचार करून १५ दिवसातच हंगाम २०१८/१९ मध्ये एफ. आर. पी. ची रक्कम रुपये २,२६७. ७८ असतांना रुपये २३२.२२ जास्तीचा दर देवून सरसकट एकरकमी रुपये २,५००/- दर देण्याचा निर्णय घेतला. आर्थिक नियोजन चांगले केल्यामुळे कामगारांचे कोणतेही पगार थकीत नाही, दरवर्षीप्रमाणे कारखान्यास ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कारखान्यास चालू आर्थिक वर्षात एकूण ४ कोटी ९७ लाख रुपये नफा झाला आहे. कारखान्याचे नख्त मूल्य हे प्लसमध्ये आहे. चालू वर्षी जायकवाडी धरण पूर्ण भरले असल्यामुळे यावर्षी पाणी सोडले जाणार नाही. त्यामुळे शेतीसाठी आवर्तन मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन त्यांनी उपस्थित सभासद शेतकऱ्यांना केले. यावेळी टाळ्यांच्या गजरात विषय पत्रिकेतील १ ते १३ विषय मंजूर करण्यात आले. अहवाल वाचन सेक्रेटरी सुनील कोल्हे यांनी केले. सूत्रसंचलन अरुण चंद्रे यांनी केले तर आभार बाळासाहेब बारहाते यांनी मानले. चालू वर्षी जायकवाडी धरण पूर्ण भरले असल्यामुळे यावर्षी पाणी सोडले जाणार नाही. त्यामुळे शेतीसाठी आवर्तन मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन त्यांनी उपस्थित सभासद शेतकऱ्यांना केले.यावेळी टाळ्यांच्या गजरात विषय पत्रिकेतील १ ते १३ विषय मंजूर करण्यात आले. यावेळी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणा-या सभासद शेतक-यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये आडसाली – विष्णू दगडू शिंदे, भरतपूर, पूर्व हंगामी – महावीर बन्सीलाल सेठी, सुरेगाव, सुरु – श्रीमती मथुराबाई मोतीगीर गोसावी, ब्राम्हणवाडा, खोडवा – दिलीप सूर्यभान गोरे वेळापूर या शेतक-यांचा समावेश होता. सभेचे सूत्रसंचालन अरुण चंद्रे यांनी केले. अहवाल वाचन सेक्रेटरी सुनील कोल्हे यांनी केले. तर आभार बाळासाहेब बारहाते यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram